पुणे - गोकुळाष्टमीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पण गेल्या दोन वर्षांपासून वाढत्या कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने मटकी विकणाऱ्या कुंभारांचे मोठे नुकसान झाले आहे.मागच्या वर्षी लॉकडाऊन तसेच दुकानेच बंद होती. त्यामुळे एकही मटकी विकली गेली नव्हती. यंदा तर दुकान उघडले तरीही दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने फक्त 100 मटक्या विकल्या गेल्या आहे. याचा कुंभार समाजाला फटका बसला आहे.
दहीहंडी नसल्याने मटक्यांना कमी मागणी; कुंभारांनी मांडली व्यथा - The pain caused by the potters
पुणे शहरात दरवर्षी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दहीहंडी साठी लागणारे मटके पुण्यातील कसबा पेठ येथील कुंभार वाड्यात तयार केली जातात. यंदा कोरोनामुळे दहीहंडी होणार नसल्याने मटक्यांना विक्री नाही.