पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे मागील चार महिन्यापासून देशभरातील व्यवहार ठप्प आहेत. सर्वच क्षेत्राला याचा फटका बसला. तसाच फटका लोककलावंतांना बसलाय. उन्हाळ्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात यात्रा, जत्रा असल्यामुळे लोककलावंतांच्या कलेला मागणी असते. परंतु हा सर्व काळ लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे या कलाकारांचा आर्थिक उत्पनाचा स्त्रोत हिरावला गेला. त्यामुळे या कलावंतांना मदत करण्याची मागणी होत आहे. लोकशाहीर नंदेश उमाप यांनीही ठाकरे सरकारने या कलावंतांना मदत करावी, अशी विनंती केली आहे.
नंदेश उमाप म्हणाले, की लोककलावंतांना सरकारने वाऱ्यावर सोडू नये यासाठी मी 20 मार्च पासून ठाकरे सरकारला विनंती करत आहे. लोककलावंत अगदी तुटपुंज्या पगारात आपली कला सादर करत असतात. यात्रा, जत्रा या काळात लोकलावंतांना कला सादर करण्यासाठी चांगली मागणी असते. याच काळात थोडेफार पैसे त्यांच्या हातात लागतात. परंतु लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर ते ही त्यांच्या हातातून निघून गेले आहेत. गेली चार महिने ही मंडळी कशी जगत होती आणि पुढील चार महिने ही मंडळी कशी जगणार आहेत हे कुणालाच माहीत नाही. त्यांना आता मदत करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे मी हात जोडून ठाकरे सरकारला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर या लोककलावंतांना मदत करावी, असे आवाहन लोकशाहीर नंदेश उमप यांनी केले.
ठाकरे सरकारने लोक कलावंतांना आर्थिक मदत करावी - नंदेश उमप - पुणे कोरोना अपडेट बातमी
गेली चार महिने ही मंडळी कशी जगत होती आणि पुढील चार महिने ही मंडळी कशी जगणार आहेत हे कुणालाच माहीत नाही. त्यांना आता मदत करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे मी हात जोडून ठाकरे सरकारला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर या लोककलावंतांना मदत करावी, असे आवाहन लोकशाहीर नंदेश उमप यांनी केले.
![ठाकरे सरकारने लोक कलावंतांना आर्थिक मदत करावी - नंदेश उमप nandesh umap on cm thackrey](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:13:16:1596249796-mh-pun-artist-news-pune-31072020171907-3107f-1596196147-5.jpg?imwidth=3840)