ETV Bharat / city

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढणार ?, काही ठिकाणी शिथिलता

author img

By

Published : May 28, 2021, 1:33 PM IST

लसीच्या खरेदीसाठी निधीची कुठलीही अडचण नाही, राज्य सरकार लस खरेदीसाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकने द्यायला तयार आहे. मात्र केंद्राकडून लस उपलब्धच होत नाही. केंद्राने जो कोटा ठरवून दिला आहे, तशा लस उपलब्ध होत आहेत असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. तसेच राज्यात दररोज 8 लाख ते 10 लाख लसीकरण करू शकतो इतकी आरोग्य विभागाची सक्षम यंत्रणा असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
१५ दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

पुणे - राज्यात ज्या जिल्ह्यांमध्येे पॉझिटिव्हीटी रेट अजूनही जास्त आहे, त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. तर जिथे कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे तिथेही काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते. पण संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राजेश टोपे शुक्रवारी साखर कारखाना बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढणार?

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. अनेक भागात पॉझिटीव्हीटी रेट खाली गेलेला आहे. मात्र जोपर्यंत हा रेट पूर्ण कमी होत नाही, तोपर्यंत संकट टळले असे म्हणता येणार नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन संदर्भात राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी रणनीती आखली जाते आहे. ऑक्सिजनची उपलब्धता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तसेच 30 तारखेपर्यंत परिस्थिती बघून लॉकडाऊन वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही टोपे म्हणाले.

लसीसाठी एका चेकने निधी द्यायला तयार-

लसीच्या खरेदीसाठी निधीची कुठलीही अडचण नाही, राज्य सरकार लस खरेदीसाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकने द्यायला तयार आहे. मात्र केंद्राकडून लस उपलब्धच होत नाही. केंद्राने जो कोटा ठरवून दिला आहे, तशा लस उपलब्ध होत आहेत असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. तसेच राज्यात दररोज 8 लाख ते 10 लाख लसीकरण करू शकतो इतकी आरोग्य विभागाची सक्षम यंत्रणा असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

विरोधकांची टीका निराधार-

दुसरीकडे राज्यात अधिवेशन न बोलवण्याच्या निर्णयावर विरोधकाकडून होत असलेल्या टीकेला टोपे यांनी उत्तर दिले, राज्य सरकारला अधिवेशन घेण्याची हिंमत नाही, अशी टीका जर विरोधक करत असतील तर, पंतप्रधानांना लोकसभेचे अधिवेशन घ्यायची हिंमत आहे की नाही? याचीही चर्चा होऊ शकते, असे प्रत्युत्तर राजेश टोपे यांनी विरोधकांच्या टिकेला दिले. तसेच देशातील सर्वच राज्यात हीच परिस्थिती आहे असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.