ETV Bharat / city

TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यातील 780 विद्यार्थ्यांची यादी रद्द, शिक्षण संचालक पुढील कारवाई करणार - List of Students in TET Exam Scam

मार्च २०१९ मध्ये झालेल्या (TET)परिक्षेचा निकाल २०२० ला लागला होता. त्यामधे १६,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.२०२१ मध्ये घोटाळा उघड झाला. ( TET Exam Scam ) यात ७ हजार ८८० विद्यार्थी यात संशयित विद्यार्थ्य्यांची यादी रद्द केली. त्यांची संपादणूक रद्द केली.२९३ जणांना बनावट प्रमाणपत्र दिले गेले होते. पुणे सायबर पोलिसांकडून ही माहिती आली यातून विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली गेली आहे.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद
author img

By

Published : Aug 8, 2022, 3:29 PM IST

Updated : Aug 8, 2022, 3:40 PM IST

पुणे - मार्च २०१९ मध्ये झालेल्या (TET)परिक्षेचा निकाल २०२० ला लागला होता. त्यामधे १६,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. २०२१ मध्ये घोटाळा उघड झाला. ( List of Students in TET Exam Scam ) यात ७ हजार ८८० विद्यार्थी यात संशयित विद्यार्थ्य्यांची यादी रद्द केली. त्यांची संपादणूक रद्द केली. २९३ जणांना बनावट प्रमाणपत्र दिले गेले होते. पुणे सायबर पोलिसांकडून ही माहिती आली यातून विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली गेली आहे.

माहिती देताना अधिकारी

टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली : या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून, यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
हीना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून, २०२० मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे. उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत.

काय आहे प्रकरण? - 2018 च्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात 12 आरोपींवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर 16 आरोपींच्या तपासाची परवानगी घेण्यात आली असून, त्यांचा तपास करण्यात येणार आहे. 2018 मध्ये टीईटी पेपरफुटी प्रकरणात 1701 विद्यार्थी हे अपात्र होते, ते पात्र करण्यात आले. त्यातील 817 विद्यार्थ्यांना मूळ निकालात मार्क वाढवून पास करण्यात आले होते आणि 884 विद्यार्थ्यांना महाटीईटी परीक्षेत पास करण्यात आले होते.

आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा - परीक्षार्थींनी एजंटला पैसे देऊन पास झाले, अशांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील यावेळी पुणे सायबरचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी केले आहे.

हेही वाचा - TET Scam in Maharashtra : मला बदनाम करण्याचे षडयंत्र : टीईटी प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

Last Updated : Aug 8, 2022, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.