ETV Bharat / city

Raj Thackeray : 'साहेब माणसं जोडायला शिका..', राजीनामा दिलेल्या मुस्लिम कार्यकर्त्याचा राज ठाकरेंना सल्ला.. - राज ठाकरे हनुमान चालीसा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील भोंगे ( Raj Thackeray Mosque Loudspeaker Issue ) न उतरविल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले ( Raj Thackeray Hanuman Chalisa ) आहेत. त्यावर पुण्यातील मनसैनिक नाराज झाले असून, राजीनामे देत ( Pune MNS Workers Resignation ) आहेत. 'साहेब, माणसं जोडायला शिका..', अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते देत आहेत.

'साहेब माणसं जोडायला शिका..', राजीनामा दिलेल्या मुस्लिम कार्यकर्त्याचा राज ठाकरेंना सल्ला..

author img

By

Published : Apr 5, 2022, 5:53 PM IST

पुणे : 'साहेब माणसं जोडायला शिका, माणूस जर एकदा तुटला तर तो परत येत नाही. त्यामुळं माणसं जोडा', अशी आर्त हाक एका जुन्या मनसैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांना दिली ( Raj Thackeray Mosque Loudspeaker Issue ) आहे. राज ठाकरे यांचा 'मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा' या विधानावरून ( Raj Thackeray Hanuman Chalisa ) नाराज होत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देखील दिली ( Pune MNS Workers Resignation ) आहे.

पुण्यात उलट चित्र : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पाडवा मेळाव्याच्या भाषणात मशिदीवरचे भोंगे खाली उतरवा. अन्यथा आम्ही मशिदीसमोर लाउड्स्पिकरवर हनुमान चालीसा वाजवू, असं वक्तव्य केलं. राज ठाकरेंच्या या विधानांनतर राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेले पहावयास मिळत आहे. मुंबईत काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावली देखील. पण पुण्यात मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मुस्लिम मनसैनिकांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. अगदी पक्षाच्या सुरुवातीपासून सोबत राहिलेल्या या पदाधिकाऱ्यांना आपला पक्ष सोडताना दुःख मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

'साहेब माणसं जोडायला शिका..', राजीनामा दिलेल्या मुस्लिम कार्यकर्त्याचा राज ठाकरेंना सल्ला..

काय म्हणत आहेत मुस्लिम मनसैनिक? : मनसेच्या स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रत्येक आंदोलनात सक्रिय असलेले पुणे शहराचे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शहबाज पंजाबी यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भावना दुखावल्या म्हणून राजीनामा दिलेला आहे. ज्या राज ठाकरेंनी सोळा वर्ष मला वाढवलं. त्याच राज ठाकरेमुळे आज मी शून्य झालो, असल्याची भावना पंजाबी यांनी व्यक्त केली आहे. यापुढे पुन्हा मनसेत जाणार नाही, अशीही भूमिका त्यांनी घेतलीय. याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांनी..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.