ETV Bharat / city

Lal Mahal : लाल महाल लावणी प्रकरण.. वैष्णवी पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील लाल महालात लावणीवर नृत्य ( Lal Mahal Lavani case ) करून त्याचे रिल्स ( Lal Mahal Lavani Reels ) सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वैष्णवी पाटील हिच्यासह तिघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात ( Faraskhana Police Station Pune ) गुन्हा दाखल करण्यात आला ( Crime against three including Vaishnavi Patil ) आहे.

Mansi Patil
मानसी पाटील
author img

By

Published : May 21, 2022, 11:19 AM IST

Updated : May 21, 2022, 2:50 PM IST

पुणे : पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य ( Lal Mahal Lavani case ) करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन ( Faraskhana Police Station Pune ) येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ( Crime against three including Vaishnavi Patil ) आहे.

रिल्स झाली व्हायरल : पुण्यातील लाल महाल येथे वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे शूट केलं होतं. यानंतर ती रिल्स ( Lal Mahal Lavani Reels ) समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. यानंतर सर्वत्र टिका होऊ लागली आणि आज पोलिसांनी तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संभाजी ब्रिगेडची मागणी : पुण्यातील लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला असताना जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केल आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडने केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट : दरम्यान, याप्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिलीय. 'पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल हि वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे .. ह्यापुढे होता कामा नाही.. कोणी केले असेल तर वापरू नका', असे ट्विट त्यांनी केले आहे.

हेही वाचा : Lal Mahal : लाल महालात तमाशाच्या गाण्यावर नाचणाऱ्यावर गुन्हा दाखल करा - संभाजी ब्रिगेड

Last Updated : May 21, 2022, 2:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.