ETV Bharat / city

Five lakh for housing : नोंदणीकृत कामगारांना घरांसाठी पावणे पाच लाख रुपये निधी मिळणार - कामगार मंत्री सुरेश खाडे - Five lakh for housing

नोंदणीकृत कामगारांना घरे बांधण्यासाठी सरकारकडून निधी मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2.75 लाख तर राज्याच्या कामगार मंत्रालयातर्फे 2 लाख रुपये असा पावणे पाच लाख रुपये निधी कामगारांना ( registered workers five lakh for housing ) मिळणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे ( Labor Minister Suresh Khade informed ) यांनी दिली आहे.

Labor Minister Suresh Khade informed registered workers will get five lakh for housing
नोंदणीकृत कामगारांना घरांसाठी पावणे पाच लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
author img

By

Published : Oct 8, 2022, 5:48 PM IST

पुणे : कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकारतर्फे प्रयत्न सुरू झाले असून, घरे बांधण्यासाठी मोकळ्या शासकीय जमिनींची माहिती देण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहे. यासाठी खाजगी विकासकांचे देखील सहकार्य घेतले जाणार आहे. नोंदणीकृत कामगारांना घरासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2.75 लाख तर राज्याच्या कामगार मंत्रालयातर्फे 2 लाख रुपये असा एकूण पावणे पाच लाख रुपये निधी कामगारांना घर घेण्यासाठी दिला जाणार आहे.अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे ( Labor Minister Suresh Khade ) यांनी दिली. ( Labor Minister Suresh Khade informed registered workers five lakh for housing )

कामगार मंत्री सुरेश खाडे पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना

'प्राईड बेस्ट फॅसिलिटी' पुरस्कार सोहळ्यात माहिती - क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे प्राईड ग्रुप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या दुसऱ्या 'प्राईड बेस्ट फॅसिलिटी' पुरस्कारा'चे वितरण राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, पुण्याचे सहायक कामगार आयुक्त दत्ता दादासो पवार, क्रेडाई'चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्र'चे अध्यक्ष सुनील फुरदे, क्रेडाई पुणे मेट्रो'चे अध्यक्ष अनिल फरांदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राईड बिल्डर्स एलएलपीला मिळाले पुरस्कार - शहरातील बांधकाम प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या कामगारांच्या राहणीमानचा दर्जा उंचावण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविणे, त्यांना चांगली वसाहत उपलब्ध करून देणे, स्वच्छ्ता प्रकल्पांची उभारणी, कौशल्य विकास तसेच कामगार सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करत, कामगारांना चांगल्या सुविधा प्रदान करणाऱ्या सदस्य बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या टीमला याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राईड बिल्डर्स एलएलपी’ने विविध गटातील सर्वाधिक पुरस्कार मिळविले.

जिल्ह्यात ईएसआय रुग्णालय उपलब्ध करणार -
करोनामुळे कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, या उपक्रमात खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी ही सहभागी व्हावे. घरांसोबताच कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ईएसआय रुग्णालय उपलब्ध करून देणे, कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवनाची उभारणी अशा विविध योजनांसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.अस यावेळी खाडे म्हणाले.

कामगारभवन उभारणार - आपला प्रत्येक कामगार ही आपली शक्ती आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. कामगारांना सुरक्षे संदर्भात देण्यात आलेल्या सुविधांचा कामगारांनी उपयोग करावा.कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालय स्तरावर कामगार भवन उभारण्यात येईल तसेच कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येईल. संघटित कामगारांसोबतच असंघटीत कामगारांसाठीदेखील सोई सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

विमा नोंदणीसाठी करा - कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि कामगार विमा योजनेशी जोडून घेता यावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु असून, त्यसाठी विकसकांनी पुढाकार घ्यावा.कामगारांना सोईसुविधा देणाऱ्यांचा गौरव केला जात आहे, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. कामगारांना चांगल्या सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कामगाराच्या आरोग्यासाठी असलेल्या विमा योजनेसाठी कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांनी केलं.यावेळी क्रेडाई संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.क्रेडाई संस्थेच्या सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील तसेच विविध उद्योग समूहांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक, तसेच कामगार उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.