ETV Bharat / city

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत काय आहेत पुण्यातील व्यापाऱ्यांच्या अपेक्षा?

author img

By

Published : Jan 28, 2022, 7:32 PM IST

Updated : Jan 28, 2022, 7:56 PM IST

मागी वर्षात अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये ( Tax slab in budget ) कुठलाच बदल करण्यात आला नव्हता. मात्र यावर्षी सरकार अर्थसंकलपात मोठा बदल करेल, अशी अपेक्षा आहे. त्यातच पुढील काही दिवसांत देशात अनेक राज्यात निवडणुका आहेत. त्याच अनुषंगाने मोदी सरकार मोठे गिफ्ट देईल, अशी अपेक्षा देशाला लागून आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांच्या अपेक्षा
पुण्यातील व्यापाऱ्यांच्या अपेक्षा

पुणे- केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला ( Union Budget 2022 ) सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पाबाबत पुण्यातील व्यापाऱ्यांनी अपेक्षा ( Pune traders expectations from budget ) व्यक्त केल्या आहेत.

मागी वर्षात अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाच बदल करण्यात आला नव्हता. मात्र यावर्षी सरकार अर्थसंकल्पात मोठा बदल करेल, अशी अपेक्षा आहे. त्यातच पुढील काही दिवसांत देशात अनेक राज्यात निवडणुका आहेत. त्याच अनुषंगाने मोदी सरकार मोठे गिफ्ट देईल, अशी अपेक्षा देशाला लागून आहे.

प्रत्येक क्षेत्राचे कोरोनामुळे नुकसान

काय आहेत पुण्यातील व्यापाऱ्यांच्या अपेक्षा
अर्थसंकल्पाबाबत व्यापाऱ्यांच्या अपेक्षा ईटीव्ही भारतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्राचे कोरोनामुळे नुकसान झाल्याचे सर्व ( loss of business due to corona ) व्यापारी सांगत आहेत. लॉकडाऊनमध्ये सारेच व्यापार बंद होते. व्यापारासाठी लागणारा खर्च सुरुच होता. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने मोठ्या मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी व्यापाऱ्यांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याचबरोबर कर प्रणालीमध्ये बदल करून जीसटीचे स्लॅब कमी करावेत, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी ( traders demand for budget ) केली आहे. गणेश शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन, पुणे, सचिन निवगुणे अध्यक्ष पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, बाळासाहेब अमराळे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ यांनी अर्थसंकल्पाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा-Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून साहिल शाहला अटक

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. ३१ जानेवारीपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 मार्च ते 8 एप्रिल असा असणार आहे. फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. यावेळी अर्थसंकल्पात सरकारचा भर कृषी क्षेत्राला चालना देण्यावर अधिक असणार आहे. कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आगामी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 18 लाख कोटींपर्यंत वाढवू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात.

हेही वाचा-Bharat Biotech Nasal Booster Dose : भारत बायोटेकच्या इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी

राष्ट्रपतींचे संबोधन
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षणही संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात संसदेत चर्चेनंतर वित्त विधेयक मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-Wuhan Scientists on NeoCov : चीनच्या शास्त्रज्ञांचा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत इशारा... तीनपैकी एकाचा मृत्यू होण्याची शक्यता

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा विळखा पाहता देशांतर्गत अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणत अस्थिर आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकार नेमक्या काय घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Jan 28, 2022, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.