पुणे : पुणे शहराला अति प्राचीन इतिहास आहे. पूर्वीचे पुण्यनगरी सध्याचे पुणे आहे. आदिलशहाच्या काळामध्ये पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवून पुणे परगणा बेचिराख केले होते. अशावेळी शहाजीराजांना पुणे परगणा सांभाळण्याची जबाबदारी होती. मासाहेब जिजाऊंनी आदिलशाही आणि निजामशाहीच्या विरोध पत्करुन त्याकाळी पुण्यामध्ये पहिला सोन्याचा नांगर फिरून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याबाबतचा इतिहास जाणून घेऊन शाहीर हेमंतराज मावळे यांच्याकडून!
कसबा पेठेची माहिती देताना पुण्यातील महत्त्वाची पेठ म्हणजे कसबा पेठ होय. पुण्याचं ग्रामदैवत असलेले गणपतीचे मंदिर देखील याच पेठेमध्ये आहे. ज्यावेळी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला गेला होता त्यावेळी येथील गणपतीचे मंदिर देखील उध्वस्त केले गेले होते. अशा पुण्यामध्ये लोकांना राहण्यासाठी देखील शक्यता नव्हती. अशा वेळी जिजाऊ माँ साहेबांनी पुण्याचा कारभार हातात घेऊन शहाजी महाराजांचा मार्गदर्शनाने १६४२ ला जिजाऊंनी शिवाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्याला लोकांनी साथ द्यावी आणि लोकांचा विश्वास बसावा यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजी महाराज फक्त राज्यकर्तेच नाही तर शेतकरी देखील आहेत याची लोकमानसात छबी निर्माण झाली. आणि जगातील ही पहिली घटना आहे सोन्याच्या फाळाने ही भूमी नांगरली गेली. यामध्ये स्वराज्याची किती उदात्त कल्पना माँ साहेब जिजाऊ आणि शहाजी राजेंच्या मनात होती हे दिसून येते.
हेही वाचा - Amravati Student Make Sword : विद्यार्थ्यांचे 'शिवप्रेम'; तलवारीवर साकारली शिवसृष्टी