ETV Bharat / city

Pune Airport Integrated Terminal : 'असे' असेल पुण्यातील विमान प्रवाशांसाठी बांधण्यात येणारे नवे इंटिग्रेटेड टर्मिनल - पुणे विमानतळ नवी इमारत

पुणे विमानतळातील ( Pune Airport ) इमारतीत गर्दी कमी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल ( Pune Airport Integrated Terminal ) बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Airport Integrated Terminal
Pune Airport Integrated Terminal
author img

By

Published : Mar 24, 2022, 4:06 PM IST

Updated : Mar 24, 2022, 4:37 PM IST

पुणे - पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्याच्या इमारतीत गर्दी कमी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल ( Pune Airport Integrated Terminal ) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat ) यांच्या अध्यक्षतेखाली आज विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. तसेच खासदार बापट यांनी नुकतीच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळ विस्तारीकरणाबाबत निवेदन दिले होते.

प्रतिक्रिया

असे असेल नवे इंटिग्रेटेड टर्मिनल - अत्याधुनिक नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल हे पूर्णत: वातानुकूलित असेल. प्रतिवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावण्याची त्याची क्षमता असेल. यात गर्दीच्यावेळी 2 हजार 300 प्रवाशांना (1 हजार 700, देशांतर्गत आणि 600 नग ) आंतरराष्ट्रीय सेवा देता येईल. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज), 8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर), 15 लिफ्ट, 34 चेक-इन काउंटर, प्रवासी सामान वहन यंत्रणा, आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्टसह आदी अद्ययावत सुविधा इमारतीत असतील. तसेच नवे टर्मिनल हे पर्यावरणपूरक असेल. त्यात खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होईल बांधकाम - या टर्मिनलमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था तसेच सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे असतील. पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारी त्याची रचना असेल. टर्मिनलचे बांधकाम हे 2018 पासून सुरू करण्यात आले आहे. त्यातील 61 टक्के काम पूर्ण झाले असून, ऑगस्ट 2022 पर्यंत ते पूर्ण होईल. विमानतळावर पार्किगसाठी जागेची कायम समस्या राहिली आहे. नव्या इमारतीमुळे त्यावर कायमस्वरुपी तोडगा निघेल. त्यासाठी 120 कोटी रुपये खर्च करून चार मजली आणि दोन मजले बेसमेंट असलेली इमारतही बांधण्यात येत आहे. त्यात 1024 वाहनांचे एकावेळी पार्किंग करता येईल. नव्या इमारतींमध्ये प्रवाशांचे मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी देखील 15 हजार चौरस फूट जागा देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील प्रवाशांना अनुकूल, असे हे नवे टर्मिनल असेल.

हेही वाचा - Sanjay Raut ED : शिवसैनिकांच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल याची आता भीती वाटते - संजय राऊत

Last Updated : Mar 24, 2022, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.