पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार असलेल्या किरण गोसावीला आज (सोमवारी) आणखी 1 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. पुणे प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांनी हा निर्णय सोमवारी दिला.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडीयो क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये किरण कोसावीने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांचं पथक किरण गोसावीला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना झालं आहे. मात्र, तो आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
एका दिवसाची केली वाढ
किरण गोसावीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून कोर्टात हजर केले होते. यावेळी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी सुरवातीला 8 दिवसांची नंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची आज (सोमवारी) मुदत संपल्यावर गोसावीला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या कोठडीत आणखी 1 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
तीन दिवसाची पोलिस कोठडीची मागणी
फिर्यादीचे वकील राहुल कुलकर्णी युक्तिवाद करताना म्हणाले की, आरोपी किरण गोसावी यांच्याकडून तीन लाखांपैकी 1 लाख मिळविण्यामध्ये यश आले आहे. तसेच त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचा पासवर्ड मिळणे आवश्यक आहे. त्यातून आणखी माहिती पुढे येण्यास मदत होईल. तो काही काळ सचिन पाटील या नावानं फिरत होता. मात्र त्याचदरम्यान कुसुम गायकवाड महिलेच्या मदतीने आधार कार्ड बनविण्यात आले आहे. या प्रकरणात तिचाही समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाकरता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी करीत होता.
गोसावी सहकार्य करीत नाही
आरोपी किरण गोसावी हा तपासात कोणत्याही प्रकाराच सहकार्य करीत नाही. यामुळे पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी फिर्यादीच्या वकिलाकडून करण्यात आली. त्यावर आरोपीचे सचिन कुंभार यांनी फिर्यादीच्या वकिलांचे आरोप खोडून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
हेही वाचा - अनिल देशमुखांचा ईडीने घेतला ताबा; ऑर्थर रोड तुरुंगातून ईडी कार्यालयात आणले
कोण आहे गोसावी
क्रुझ ड्रग प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे गोसावी वादात अडकला आहे. त्याविरोधातील काही फसवणुकीची प्रकरणेही समोर आली आहेत.
पुणे पोलिस गोसावींच्या शोधात
नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांनी गोसावी याचा शोध सुरू केला. गोसावींनी फरासखाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जाहीर केली होती.
काय आहे प्रकरण
किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावीने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध घेत होते.
गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीसाचा संपर्क
किरण गोसावी यांच्या विरोधात पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर होते. आता पालघर पोलीस गोसाविला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीसांच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा - नोटाबंदीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे - संजय राऊत