पुणे - पुण्यात कधी काय होईल याचे नेम कोणालाच नसते. आजपर्यंत आपण भाई ( Khandu Bhai birthday celebrated in Pune ) का बर्थडे ची चर्चा वेळोवेळी पहिलीच आहे, पण सध्या चर्चा सुरू आहे ती खंडू भाईच्या ( Dog Birthday Pune news ) वाढदिवसाची. नेमका हा खंडू भाई कोण? पाहूया.
हेही वाचा - Attacked by Minors : इंस्टाग्रामवर स्टेटस् ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन टोळक्याचा मित्रावर खूनी हल्ला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक भटका श्वान आहे, त्याचे नाव आहे खंडू. हा खंडू सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा लाडका श्वान. खंडूचा वाढदिवस विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून 26 मे ला साजरा करण्यात आला. ते ही चक्क केक कापत, फटाके फोडत. सध्या सोशल मीडियावर खंडू भाईच्या वाढदिवसाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
![Khandu Bhai birthday celebrated in Pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15441872_th.jpg)
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्यावतीने खंडूचे इन्स्टाग्रामवर अकाउंट असून त्यावर त्याचे वेगवेगळे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. भटक्या श्वानंवर देखील प्रेम केले पाहिजे, असे यातून संदेश देण्यात आला आहे.
हेही वाचा - डेक्कन क्वीनचा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा, प्रवाशांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा