ETV Bharat / city

Ficci program Pune Kapil Dev : महिला प्रत्येक क्षेत्रात आल्यास भारत देश प्रगतीपथावर जाईल - कपिल देव

भारत देशातील महिला या खूप मेहनती, कर्तुत्ववान आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारची गुणवत्ता आहे. त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या ( Ficci program pune Kapil Dev ) तर भारत देश प्रगतीचे शिखर गाठेल, असा विश्वास जागतिक क्रिकेटपटू कपिल देव ( Kapil dev on women empowerment in Ficci program ) यांनी व्यक्त केला.

author img

By

Published : Apr 17, 2022, 11:48 AM IST

kapil dev on women empowerment in Ficci program
फिक्की कार्यक्रम पुणे कपिल देव

पूणे - भारत देशातील महिला या खूप मेहनती, कर्तुत्ववान आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारची गुणवत्ता आहे. त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या ( Ficci program pune Kapil Dev ) तर भारत देश प्रगतीचे शिखर गाठेल, असा विश्वास जागतिक क्रिकेटपटू कपिल देव ( Kapil dev on women empowerment in Ficci program ) यांनी पुण्यातील फिक्की फ्लो महिला विंगच्या वतीने आयोजित महिला उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित एका परिषदेत व्यक्त केला.

हेही वाचा - Pune NCP Vs MNS : पुण्यात राष्ट्रवादीची मंदिरात इफ्तार पार्टी तर मनसेची राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाची आरती

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिक्की महिला विंगच्या वतीने क्रिकेटपटू कपिलदेव यांनी पुण्यात मुक्त संवाद साधला. यावेळी कपिल देव ( Kapil dev ) यांचे सहकारी क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू, फिक्की महिला विंगच्या अध्यक्षा नीलम शेवलेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष रेखा मगर, उपाध्यक्ष पिंकी राजपाल, खजिनदार सोनिया राव, सहखजिनदार पुनम खोच्चर, सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनीस, उषा पूनावाला यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

देशासाठी क्रिकेट खेळणे हे कधीच प्रेशर वाटले नाही, तर ते कायमच आनंददायी आणि प्रेरणादायी होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कायम जिंकण्याचा विचार करा, स्वतःवर प्रेम करा, प्रामाणिकपणे काम करा, जीवनाच्या खेळात नक्कीच जिंकाल, असा विश्वास ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कपिल देव यांनी १९८३ मध्ये कर्णधार असताना विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा दिला. क्रिकेटच्या खेळासोबत जीवनातील चढ-उतार, तसेच विश्वचषक जिंकण्यापर्यंतचे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

खेळांमध्ये प्रामाणिकपणा आवश्यक आहे. सध्या सर्वजण प्रेशर खाली आहेत, असे सांगत असतात. परंतु, कोणती गोष्ट प्रेशर ऐवजी प्लेझर म्हणून समजल्यास नक्कीच यश मिळते. मी एकत्र कुटुंब पद्धतीतून आल्यामुळे मला चांगले संस्कार मिळाले. सर्वांची काळजी, सगळ्यांना सोबत घेऊन जाणे, यामुळे मी संघाचे चांगले नेतृत्व करू शकलो. कोणत्याही परिस्थितीत माणूस यशस्वी होऊ शकतो. मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे. आता मोठ्या प्रमाणावर साधने उपलब्ध आहेत. परंतु, आमच्या काळात पैसे मिळत नसत, त्यामुळे फसवणूक करणे दूरच होते. सगळ्या व्यक्ती सारख्या असू शकत नाहीत. एखादी व्यक्ती चुकीची असू शकते. त्यामुळे, सर्वांना वाईट समजू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा. नक्कीच तुम्ही जिंकू शकता. खेळात जिंकणे किंवा कोणतीही गोष्ट मिळवणे यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न यातून यश नक्की मिळते, अशा शब्दात कपील देव यांनी पुण्यातील महिला उद्योजकांचा विश्वास आणखी दृढ केला.

हेही वाचा - Shivsena on Chandrakat Patil : ...हिमालयात कधी जाताय ?, शिवसेनेची बॅनरबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.