ETV Bharat / city

पुण्यात घरकाम करणाऱ्या महिलेने चोरलेले दागिने जप्त

author img

By

Published : Mar 9, 2021, 3:31 AM IST

हडपसर पोलिसांनी मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या एका मोलकरणीला अटक केले. तिच्या ताब्यातून 28 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या

Jewelery stolen by housewife in Pune
पुण्यात घरकाम करणाऱ्या महिलेने चोरलेले दागिने जप्त

पुणे - हडपसर पोलिसांनी मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या एका मोलकरणीला अटक केले. तिच्या ताब्यातून 28 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या दागिन्यांची किंमत 14 लाख 93 हजार रुपये इतकी आहे. बंगारेव्वा चंद्रम हराळे (वय 29, रा. चडचण, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय राजन फराटे (वय 33) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपुर्वी तक्रारदार विजय त्यांच्या आई-वडिलांना तपासणीसाठी रूग्णालयात घेउन गेले होते. त्यावेळी घरात काम करीत असलेली मोलकरीण बंगारेव्वा हिने 15 लाख रूपयांचे दागिने चोरून नेले होते.

याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत असताना, संबंधित मोलकरीण कोल्हापूर, सिंधूदुर्गमध्ये जाउन पुन्हा पुण्यात आल्याची माहिती पोलीस शिपाई निखील पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना सापळा रचून बंगारेव्वाला ताब्यात घेतले. तिच्याकडून 15 लाख रूपये किमतीचे 28 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या सिद्धांतने जेईई मेन परीक्षेत मिळवले 100 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.