ETV Bharat / city

आशादायक; दुष्काळात सामाजिक बांधिलकीतून चालवली जाते गोशाळा

शिरुर तालुक्यातील पूर्व भागात कायमस्वरुपी दुष्काळी संकट पहायला मिळते. मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांना दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर सहन कराव्या लागतात. त्यामुळे पशुधन सांभाळणे कठीण होते.

गोशाळा
author img

By

Published : May 16, 2019, 2:17 PM IST

Updated : May 18, 2019, 7:23 AM IST

पुणे - गो रक्षण हीच खरी भक्ती आहे, ही प्रेरणा घेऊन पाबळ येथील जैन बांधवांनी एकत्र येऊन गोशाळा सुरू केली आहे. असे म्हटले जाते, की माणूस जेव्हा माणुसकीतून पहायला लागतो, तेव्हा त्याला पशूंमध्येही देव दिसतो. याच पशुधनाची सेवा पाबळ येथील गोशाळेत केली जात आहे.

गोशाळा

शिरुर तालुक्यातील पूर्व भागात कायमस्वरुपी दुष्काळी संकट पहायला मिळते. या परिसरात सिंचनाची कुठलीही सुविधा आजवर उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांना दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर सहन कराव्या लागतात. त्यामुळे पशुधन सांभाळणे कठीण होते.

दुष्काळी परिस्थितीत जीवापाड जपलेले पशुधन कसायाच्या हातात देण्यापेक्षा गोशाळेत देण्यास नागरिक पसंती देत आहेत. सामाजिक दायित्वातून सुरू झालेली ही जैन धर्मियांची गोशाळा सर्व सुविधांनी संपन्न आहे. या ठिकाणी जनावरांना चांगल्या दर्जाचा चारा आणि उपचार, असे सारे काही मोफत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन संकटात आल्यानंतर हिच गोशाळा पशुधनाची सेवा करते, हिच खरी सामाजिक बांधिलकी आहे.

केवळ गोवंश बंदी कायदा लागू केला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. भाकड गाई, वयोवृद्ध जनावरांच्या संगोपनासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असतानाही सरकारकडून केवळ आश्वासनांचा पाऊसच पाडला जातो. त्यामुळे कष्टकरी बळीराज्याचे पशुधन संकटात येत चालले आहे. पशुधन वाचवा, असे म्हणणाऱ्यांनी पशुधनाच्या संगोपनासाठी काही तरी करण्याची काळाची गरज बनत चालली आहे.

Intro:Anc__गो रक्षण हि खरी भक्ती आहे हिच प्रेरणा घेऊन पाबळ येथील जैन बांधवांनी एकत्र येऊन गोशाळा सुरु केली..! असं म्हणतात माणुस जेव्हा माणुसकीतुन पहायला लागतो तेव्हा त्याला पशुमध्येही देव दिसतो याच पशुधनाची सेवा पाबळ येथील गोशाळेत केली जाते.....चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट...

Vo_शिरुर तालुक्यातील पुर्व भागात कायमस्वरुपी दुष्काळी संकट पहायला मिळत असतं कारण या परिसरात सिंचनाची कुठलीही सुविधा आजपर्यंत उपलब्ध झाली नाही त्यामुळे मानवी जीवनासह पशु पक्षी प्राण्यांना दुष्काळी झाळा मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागतात त्यामुळे पशुधन सांभाळणं कठीण होतं..य

Byte...किशोर रत्नपाकखी_ व्यवस्थापक गोशाळा.

दुष्काळी कठीण परिस्थितीत पोटच्या मुलाप्रमाणं सांभळ केलं पशुधन कसायाच्या हातात देण्यापेक्षा गोशाळेत देण्यावर नागरिक पसंती देऊ लागलेत..

Vo__सामाजिक दायित्वातुन सुरु झालेली हि जैन धर्मीयांची हि गोशाळा सर्व सुविधांनी संपन्न असुन या ठिकाणी जनावरांना चांगल्या दर्जाचा चारा,उपचार,असं सारं काही मोफत दिलं जातं त्यामुळं शेतक-यांचं पशुधन संकटात आल्यानंतर हिच गोशाळा देवाच्या रुपात पशुधनाची सेवा करते हिच खरी सामाजिक बांधिलकीची आहे

Byte __मच्छिंद्र इचके__पशुवैद्यकीय डॉक्टर

Vo__फक्त गोवंश बंदी कायदा लागू केला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही भाकड गाई,वयोवृद्ध जनावरांचा संगोपनासाठी ठोस उपाययोजना करण्याची काळजी गरज असतानाही सरकारकडुन फक्त आश्वासनाचा पाऊसच पाडला जातोय त्यामुळे कष्टकरी बळीराज्याचं पशुधन संकटात येत चाललय...

End vo__पशुधन वाचवा असं म्हणणा-यांनी पशुधनाच्या संगोपनासाठी काहीतरी करण्याची काळजी गरज बनत चालली आहे हेच या निमित्ताने सांगावे लागेल...Body:....Conclusion:
Last Updated : May 18, 2019, 7:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.