पुणे - बोगस दस्तावेजांच्या आधारे 27 कोटींचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar in mumbai bank bogus loan case ) आणि भाजपचे बीड जिल्ह्यातील विधान परिषद आमदार सुरेश धस ( Suresh Dhas in mumbai bank bogus loan case ) अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे आदेश -
धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले आहेत. मुंबै बँकेने या कर्जप्रकरणात मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद व आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे. हितसंबंधित लोकांना कर्ज वाटप केलेले आहे. त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे 27कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्यामुळे कर्ज देणार व घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व अनियमितता अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत.
हेही वाचा - Chitra Ramakrishna Arrested : चित्रा रामकृष्ण यांना अटक, सीबीआयची कारवाई