पुणे - शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 7 हजार 800 बोगस शिक्षकांची यादी समोर आली असून संपूर्ण राज्यात हे बोगस शिक्षक सापडले आहेत. पुणे पोलिसांकडून राज्यात विभागनुसार त्याचबरोबर 36 जिल्ह्यामध्ये किती बोगस शिक्षक आहेत, याचा आकडा समोर आला आहे. यात सर्वाधिक नाशिक येथे 1154 बोगस शिक्षक असून तर सर्वात कमी 09 बोगस शिक्षक हे गोंदिया येथे असल्याची माहिती समोर आली आहे.
२०१९-२० च्या टीईटी परीक्षेतील पहिला पेपर एक लाख ८८ हजार ६८८ उमेदवारांनी दिला होता. त्यातील १० हजार ४८७ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. पेपर दोनसाठी 1 लाख ५४ हजार ५९६ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सहा हजार १०५ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. हा निकाल १९ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आला होता. या पडताळणीत सात हजार ८०० विद्यार्थी अपात्र असताना त्यांना पात्र दाखविल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - TET Scam Chargesheet Filled : टीईटी घोटाळा प्रकरणात तीन हजार 955 पानांचं दोषारोपपत्र दाखल