पुणे - सासवड येथील दहेरी हत्याकांडातील आरोपी निलेश जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात २४ मे रोजी भोंगळे वाईन्ससमोर जगताप यांनी तीन भिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. यात तिघांचा मृत्यू झाला होता. याबाबत सखोल तपासाची मागणी नागरीकांनी केली होती. याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासात मृत भिकाऱ्यांना मारहान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी 30 मे रोजी सासवड येथील निलेश जगताप यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल(Nilesh Jagtap charged with murder)केला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला होता. या घटनेसंदर्भांत जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून तपासाबाबत माहिती घेत सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट: या प्रकरणात सुरवातीला तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे होता. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी स्वतः कडे घेतला होता. मात्र, हा तपास आता भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. आरोपी निलेश जयवंत जगताप याला अटक (police arrested bye Nilesh Jagtap) करण्यात आली असून, त्याच्या पोलीस कोठडीत सोमवार पर्यंतची वाढ करण्यात आली आहे.