ETV Bharat / city

Pankaj Dahane Inquiry : फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची चौकशी - Police Pankaj Dahane in phone tapping case

राज्यात तत्कालीन भजपा सरकार असताना राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सध्या नागपूर येथे एस. आर. पी. एफ'चे कमांडर आहेत. (phone tapping case) त्यांची यांची पुणे पोलिसांकडून दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे.

पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे

author img

By

Published : Mar 23, 2022, 12:45 PM IST

Updated : Mar 23, 2022, 1:28 PM IST

पुणे - राज्यात तत्कालीन भजपा सरकार असताना राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सध्या नागपूर येथे एस. आर. पी. एफ'चे कमांडर आहेत. (Police Pankaj Dahane in phone tapping case) त्यांची यांची पुणे पोलिसांकडून दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ? - पुणे, शहरातील अमली पदार्थांचे तस्कर व कुविख्यात गुन्हेगारांच्या नावावर राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्यावरून माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्ला यांनी राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख यांच्यासह पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांच्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

पोलीस दलात अनेक ठिकाणी त्यांनी महत्वाच्या पदावर काम - रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्तालय मध्ये पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पंकज डहाणे हे पुणे पोलिसात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही तर पुणे पोलिसांनी दोन दिवस पंकज डहाणे यांची कसून चौकशी केली आहे. पंकज डहाणे हे मूळचे अमरावतीचे आहेत. पोलीस दलात अनेक ठिकाणी त्यांनी महत्वाच्या पदावर काम केले आहे.

या प्रकरणी नेमण्यात आली होती उच्चस्तरिय समिती- पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त शुक्ला व इतरांवर भारतीय तार अधिनियम कलम २६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे मोबाईल टॅपिंग केले गेले होते. २०१५ ते २०१९ दरम्यान हे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे.

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - हे सगळे आरोप होत असताना राज्य सरकारने या प्रकरणासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली होती या समितीच्या अहवालानंतरच पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजकीय हेतूने हे फोन टॅप केल्याचे उच्चस्थरीय समितीच्या चौकशीत समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Ukraine War Updates : रशिया युक्रेन युद्धाचा 28 वा दिवस, भारत- ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली चिंता

Last Updated : Mar 23, 2022, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.