ETV Bharat / city

Highways toll tax Increase : हायवेवरील टोल टॅक्समध्ये ६५ रुपयांपर्यंत वाढ, पाहा कोणत्या गाडीला किती टोल द्यावा लागणार

author img

By

Published : Apr 5, 2022, 8:18 PM IST

तुम्ही जर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणार असाल, तर आता तुम्हाला जादाचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण, हायवेवरील टोल टॅक्समध्ये ( Increase in toll tax on highways ) 65 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

Highways toll
Highways toll

पुणे: घरगुती गॅस, डिझेल, पेट्रोल, तेल, सीएनजी आणि आता त्याच्याबरोबर तुमचा प्रवासही महागात पडू शकतो, हायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही जर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणार असाल, तर आता तुम्हाला जादाचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण, हायवेवरील टोल टॅक्समध्ये 65 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

तुम्ही जर महामार्गावरून प्रवास करीत असाल, तर हे तुमच्यासाठी आहे (1 एप्रिल) नॅशनल हायवेवरून प्रवास करणे महाग झाले आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ( National Highway Authority of India ) ने संपूर्ण देशभरात 1 एप्रिल 2022 पासून टोल टॅक्स मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी टोल टॅक्समध्ये जवळपास 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या वाहनांसाठी आता वेगवेगळा टोल टॅक्स द्यावा लागणार आहे. 10 रुपयांपासून 65 रुपयांपर्यंत टोल टॅक्स वाढवण्यात आला आहे. कमर्शियल व्हेईकलच्या टोल मध्ये 65 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांसाठी 10 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

एनएचएआयचे प्रोजेक्ट डायरेक्टर एनएन गिरी ( NHAI Project Director NN Giri ) यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2022-23 साठी टोल टॅक्स मध्ये वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, दिल्लीला जोडणाऱ्या राजमार्गांवर टोलची किंमत चारचाकी वाहनांसाठी वाढवली गेली आहे. 1 एप्रिल पासून ओव्हरसाइज वाहनासाठी 65 रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे. याशिवाय, देशात आता एक्सप्रेसवर फ्री प्रवास करता येणार नाही. सोबत या दरात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आतापर्यंत कार-जीप चालकांसाठी 140 रुपये ऐवजी 155 रुपये द्यावे लागेल.

या निर्णयानंतर अनेकांना आता जास्तीचा टोल भरावा लागणार आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे आता महाग होणार आहे. या टोल टॅक्स मध्ये 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी 10 टक्क्यांहून कमी वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर देशात लागू करण्यात आले आहेत. 1 एप्रिल पासून मोठ्या कमर्शियल वाहने (ट्रक, बस, आणि याच पद्धतीचे वाहने) आधी 205 रुपये टोल देत होते. ते आता वाढून 235 रुपये झाले आहे. कार आणि जीपसाठी टोल शुल्क 10 रुपये वाढून आता 70 रुपये ऐवजी 80 रुपये झाला आहे. याचप्रमाणे मिनीबस वाहनांसाठी 100 रुपयांऐवजी 115 रुपये मोजावे लागणार आहे. देशात प्रवास करताना एक्सप्रेसवेवर टोल द्यावा लागणार.

हेही वाचा - Raj Thackeray Loudspeaker Issue : 'मला वाटतंय माझं शहर शांत राहिलं पाहिजे' : मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.