पुणे - शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर तसेच विविध बंदोबस्तात सहभागी होणारे पोलीसही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. (Many Police Employees Corona Infected) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत शहर पोलीस दलातील तब्बल 504 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल (दि. 18 जानेवारी)रोजी झालेल्या चाचणीत 21 (Many Police Employees Corona Positive)पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
504 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. मुंबईत बहुसंख्य पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांत केलेल्या कोरोना चाचणीत पुण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मिळून साधारण 504 जण कोरोना बाधित झाले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली, यात 504 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील 40 पोलीस कर्मचारी यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. शहरातील 453 पोलीस अंमलदार, 51 पोलीस अधिकारी असे एकूण - 504 कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये 01 पोलीस अंमलदार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. काल झालेली एकूण रुग्ण वाढ 21 असून 40 अमलदार बरे होऊन कर्तव्यावर हजर झालेले आहेत .
शहरात वाढतोय कोरोना
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर कोरोना रुग्णांचा आकडा हजारांच्या वर वाढत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरात आज अखेरीस 38 हजार 7 ऍक्टिव्ह रुग्ण झाले आहेत.
हेही वाचा -केअर्स फंड ट्रस्टच्या वेबसाइटवर पंतप्रधानांचे छायाचित्र वापरण्यास मज्जाव नाही