ETV Bharat / city

Bakri Eid 2022 : काय आहे इतिहास आणि ईदचे महत्व! वाचा सविस्तर

author img

By

Published : Jul 10, 2022, 8:08 AM IST

Updated : Jul 10, 2022, 9:39 AM IST

इस्लामिक कॅलेंडरच्या ( Islamic calendar ) शेवटचा महिना झिलहजच्या दहाव्या दिवशी बकरी ईद ( Bakri Eid 2022 ) साजरी करण्यात येत असते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे.

बकरी ईद
बकरी ईद

पुणे - कोरोनाच्या ( Corona ) पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव गेल्या 2 वर्ष निर्बंधात ( Restrictions ) साजरी करावे लागले आहेत. यंदा मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव ( festivals ) हे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. देशभरात सर्वच मुस्लिम धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणांच्या पैकी एक असलेली बकरी ईद साजरी होणार आहे. बकरी ईद म्हणजे काय...काय केलं जातं या दिवशी..पाहूया बकरी ईदचा महत्त्व काय आहे.

बकरी ईद का साजरी केली जाते - इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटचा महिना झिलहजच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येत असते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. या दिवशी सर्वच मुस्लिम बांधव बोकड ( बकऱ्याची ) ची कुर्बानी देऊन ईदगाह, मशीद येथे नमाज पठण करून, ही ईद साजरी करतात.

बकरी ईदचा इतिहास - बकरी ईद साजरी करण्यामागे एक इतिहास आहे. हजरत इब्राहीम अलैहि व सल्लम हे परमेश्वराचे ( अल्ल्हाचे ) दुत होते. यांना याच दिवशी अल्लाह ने स्वप्नात येऊन त्यांचा पुत्र हजरत इस्माईल यांची कुर्बनी मंगितली होती. आणि अल्लाने सांगितल्यावर हजरत इब्राहिम हे मुलाची कुर्बानी देण्यासाठी मुलाला घेऊन जाण्यासाठी निघाले. हजरत इब्राहिम यांनी मुलाच्या प्रती असलेले प्रेम कुर्बानी देताना आड येऊ नये, म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यांनी जेव्हा कुर्बानी दिली आणि डोळ्यांवरील पट्टी हटवल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा सुरक्षित दिसला. अल्‍लाहने चमत्‍कार केला आणि मुलाच्या जागी बकरा ( दुंब्बा ) कुर्बान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हजरत इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि बकर्‍याची कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून मुस्लिम धर्मीय हे याच दिवशी कुर्बानी देतात, अशी माहिती यावेळी शिया मुस्लिम धर्मगुरू मौलाना शबी हसन काझमी यांनी दिली.

अशी साजरी केली जाते बकरी ईद - बकरी ईद ला ईद- उझ- झोहा ही म्हटलं जातं. त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे ‘ईद- उझ- झोहा ही ईद 3 दिवस साजरी केली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव ‘बकरी किंवा बोकड’ अल्लाहला समर्पित करतात. यातून मिळणाऱ्या मटणाचे 3 भाग केले जातात. पहिला भाग हा कुटुंबियांसाठी असतो, दुसरा भाग नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये वाटला जातो. शेवटचा, तिसरा भाग अन्नासाठी भुकेलेल्या गरिबांना दिला जातो.‘कुराण’ सर्वांनाच समर्पण करण्याची सक्ती करत नाही, ज्यांना शक्य आहे. त्यांनीच बकरी किंवा बोकडाचा बळी द्यावा आणि मिळणारे मटण गरिबांसोबत वाटून खावे असे ‘कुरआन’ मध्ये सांगितले आहे, असे देखील यावेळी काझमी यांनी सांगितले आहे.

या ईंदला बकऱ्याची कुर्बाणी दिली जाते. पण या दिवशी माणसाने स्वतः च्या अहंकार, स्वतःच्या जवळ असलेल्या मी पणा याची देखील यावेळी कुर्बानी दिली पाहिजे. आज जगात सर्वांना प्रेमाची गरज असून, सर्वांनी प्रेमाने वागल पाहिजे. या दिवशी गोरगरिबांना मदत करुन, बकरी ईद साजरी केली पाहिजे, असे यावेळी काझमी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2022: वारीच्या महासागरात पावसाने केले भाविकांचे हाल; राहुट्यात घेतला आसरा

Last Updated : Jul 10, 2022, 9:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.