ETV Bharat / city

महापौरांच्या हस्ते अखिल मंडई गणरायाचे विसर्जन - गणेशोत्सव 2021

आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या गज गवाक्ष अमृत कुंडात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं चे विसर्जन करण्यात आले.

akhil mandai ganpati
akhil mandai ganpati
author img

By

Published : Sep 19, 2021, 10:39 PM IST

पुणे - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष....मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर...फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या गज गवाक्ष अमृत कुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं चे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन झाले.

अखिल मंडई गणरायाचे विसर्जन
यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरज थोरात उपस्थित होते. अण्णा थोरात म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे साधेपणाने मंदिरातच उत्सव साजरा केला आणि मंदिर परिसरातच विसर्जन केले. पुणेकरांनी देखील मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी न करता उत्सव यशस्वी करण्यास सहकार्य केले, याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. हेही वाचा - भाजपा किरीट सोमैयांच्या पाठीशी; त्यांचा आवाज दडपता येणार नाही - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.