पुणे मनसेचे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत पुणे दौऱ्यादरम्यान मनसेच्या महिला सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय यावेळी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी पत्रकारांसोबत अनौचारिक संवाद साधला तेव्हा तुम्ही पत्रकारांशी बोलण का टाळता असा सवाल अमित ठाकरेंना विचारण्यात आला त्यावर ते काम करायला संजय राऊत आहे ना असा टोला लगावला तर संजय राऊत आतमध्ये आहे असा प्रश्न विचारला असता मी काय संजय राऊतांची रिप्लेसमेट आहे का अशी मिश्किल प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी व्यक्त केली im not replacement sanjay raut say mns leader amit thackeray आहे
प्रश्न तुमच्या गृहमंत्री पदाबाबत खूप चर्चा झाली
मी गृहमंत्री होणार ही अफवा होती पण पुढचे वीस दिवस मला पत्रकार याबाबतच विचारत होते ही बातमी खोटी आहे हे सांगून मी थकलो होतो म्हणून मी म्हटलं गृहमंत्री पद दिलं तर आपण विचारू करू
प्रश्न तुम्ही जाईल तिथं बोलायला हवं बातमी द्यायला हवी
संजय राऊत सगळं पुरवतात ना
प्रश्न ते सध्या तुरुंगात आहेत ना
मला संजय राऊत यांची रिप्लेसमेंट नाही बरं का.
प्रश्न त्या वीस दिवसांत काय विचार केला गृहमंत्री झालं तर राज्यात काय बदल केला असता
मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल ते सांगतील तेच मी करेन
प्रश्न सगळे नेते राज्याचे दौरे करतायेत मुख्यमंत्री ही राज्यभर फिरतायेत तुम्हाला काय दिसतंय काय करायला हवं असं वाटतंय
सगळंच करायला हवं काय होतच नाही सध्या पण सध्या मी विद्यार्थ्यांसाठी फिरतोय त्यांच्याशी संवाद साधतोय त्यांचे प्रश्न जाणून घेतोय
प्रश्न विद्यार्थ्यांचे प्राधान्याने कोणते तीन प्रश्न आहेत
रोजगार आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा या समस्या विध्यार्थ्यांना भेडसावत आहेत या सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा त्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे त्याचपार्श्वभूमीवर हा दौरा आहे.
प्रश्न सध्याचं राजकारण पाहता युवकांनी राजकारणात का यावं आणि ते येतील का
येत आहेतच की मी पण तेच सांगतोय की मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात कधीच आलो नसतो मला लोकांसाठी काम करायला आवडतं पण ही आवडतं पण ही आवड असली तरी सध्याच राजकारण पाहता मी कधीच राजकारणात आलो नसतो मात्र माझ्यासाठी राज साहेबांनी प्लॅटफॉर्म तयार करून दिलंय त्यामुळे दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय
प्रश्न राज्यात जे सत्ताबदल झालं त्याबाबद्दल तुम्हाला काय वाटत
सत्ता बदलाचे मला काही वाटत नाही मी बातम्या वाचतच नाही माझं फोकस क्लिअर आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे यासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांना उपलब्ध होईन म्हणून मी माझा नंबर त्यांना देतो आहे
प्रश्न युवकांनी कोणावर विश्वास ठेऊन राजकारणात यायचं
माझ्यावर विश्वास ठेवून यावं.
हेही वाचा - Sanjay Sirsat संजय शिरसाटांचे शिंदे गटात बंड उद्धव ठाकरेंना संबोधलं कुटुंबप्रमुख