ETV Bharat / city

मेफेरटाईन सल्फेट इंजेक्शन'ची बेकायदा विक्री करणाऱ्यांना अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Oct 19, 2021, 2:17 PM IST

मेफेररटाइन सल्फेट या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या चौघांना बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, त्यांच्याकडून या इंजेक्शनच्या 211 बॉटल्स अन एक स्विफ्ट कार असा एकूण 2 लाख 6 हजार 548 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परेश रेणूसे, प्रविणसिंग भाटी, अक्षय वांजले, शौनक संकपाळ, अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

मेफेरटाईन सल्फेट इंजेक्शन'ची बेकायदा विक्री करणाऱ्यांना अटक

पुणे - मेफेररटाइन सल्फेट या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या चौघांना बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, त्यांच्याकडून या इंजेक्शनच्या 211 बॉटल्स अन एक स्विफ्ट कार असा एकूण 2 लाख 6 हजार 548 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परेश रेणूसे, प्रविणसिंग भाटी, अक्षय वांजले, शौनक संकपाळ, अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

सिक्स पॅक्ससाठी बेकायदेशीर विक्री

चित्रपटामधील 'सिक्स पॅक' अॅब्ज असणाऱ्या हिरोंना पाहून त्यांच्यासारखीच बॉडी बनवण्याची इच्छा अनेकांना असते. त्यातून सिक्स पॅक व्हायचे वेध लागतात आणि जिममध्ये जाऊन घाम गाळून चित्रपटातील हिरोप्रमाणे बॉडी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याचवेळी लवकरात लवकर रिझल्ट मिळवण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. मात्र, ही औषधे घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्यास सांगितले जाते. परंतु, याकडे दुर्लक्ष करुन बेकायदा औषधे खरेदी केली जाते. अशाच बेकायदा औषध विक्री करणाऱ्या या चार जणांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. रेणूसे हा जिम ट्रेनर म्हणून काम करतो. मेफेररटाइन सल्फेट हे इंजेक्शन हृद्यदाब वाढविण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांनाच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येते. असे असतानाही हे चौघेजण जिममध्ये येणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी वाढवण्यासाठी या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत होते.

मेफेररटाइन सल्फेट इंजेक्शन
मेफेररटाइन सल्फेट इंजेक्शन

त्याच्याकडून या इंजेक्शनच्या 211 बॉटल्स जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात एकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शरीरसौष्ठव व शरीरयष्टी वृद्धीसाठी मेंफरटाईन सल्फेट इंजेक्शनची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे यांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून परेश रेणुसेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 211 बाटल्या जप्त केल्या. रेणुसेकडे सखोल चौकशी केली असता त्याने हे औषध शौनक संकपाळ याने विक्री करण्यासाठी दिली असल्याचे सांगितले.

हेही वाचा - पत्नीशी भांडण झाल्यानंतर गड्याने पेटवली दहा घरं, परिसराला अग्नितांडवाचे स्वरुप;व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.