पुणे - हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र माळवदकर यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी आझम कॅम्पसचे पी.ए. इनामदार, श्रीपाल सबनीस यांनी सहभाग घेतला होता.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आदर्श - सद्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या दोन विषयामुळे तापले असून यामध्ये देखील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आदर्श वस्तुपाठ घालून देणारा उपक्रम पुण्यात गेल्या 36 वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. या इफ्तार पार्टी मध्ये हिंदू बांधवांच्याकडून रोजे सोडण्यासाठी कलिंगड, खरबूज, आंबे दिले गेले.