ETV Bharat / city

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात माझा सहभाग नाही, संशयित आरोपी संतोष जाधव याची माहिती - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण संतोष जाधव माहिती

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणामध्ये ( Santosh Jadhav on murderof Sidhu Musewala ) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकारणात आपला सहभाग नसल्याचे चौकशीत संशयित आरोपी संतोष जाधव याने म्हटले आहे.

Santosh Jadhav on murderof Sidhu Musewala
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण संतोष जाधव माहिती
author img

By

Published : Jun 18, 2022, 9:51 AM IST

Updated : Jun 18, 2022, 9:56 AM IST

पुणे - सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणामध्ये ( Santosh Jadhav on murderof Sidhu Musewala ) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकारणात आपला सहभाग नसल्याचे चौकशीत संशयित आरोपी संतोष जाधव याने म्हटले आहे. त्यामुळे, तपास यंत्रणेला ( Santosh Jadhav news pune ) मोठा झटका बसला आहे.

हेही वाचा - SSC Result Declared : दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी, तर 'या' विभागाचा निकाल सर्वाधिक

मागच्याच आठवड्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आणि मंचर येथील गुन्ह्यांशी संबंधित फरार आरोपी संतोष जाधव याला गुजराथ येथून अटक केली होती. यानंतर संतोष याचा तपास पोलिसांच्यावतीने सुरू होता. यावेळी पंजाब पोलिसांचे पथकाने देखील संतोष जाधव याच्या चौकशीसाठी 2 दिवस पुण्यात येऊन मुसेवाला प्रकरणात चौकशी केली.

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या दिवशी आपण गुजरातमध्ये होतो, असे संतोष जाधव याने चौकशीत सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे, संतोष जाधवच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी पुण्याचे पथक गुजरात आणि मध्य प्रदेश येथे गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. यापूर्वी देखील सौरभ महाकाळ याने मुसेवाला हत्या प्रकारणात सहभागी नसल्याचे सांगितले होते. तर, दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी 8 शूटर्सचे फोटो जारी केले होते आणि संतोष हा या हत्याकांडाचा मुख्य शूटर असल्याचा दावा केला होता. आता या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस कशा पद्धतीने तपास करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - SSC Result 2022 : दहावीच्या परीक्षेत जाधवांच्या दादाचा विक्रम; सर्व विषयात 35 टक्के

Last Updated : Jun 18, 2022, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.