ETV Bharat / city

ती आली... तिने बघितले... ती उधळली... पुण्यात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, घटना CCTVमध्ये कैद - पुणे बातमी

म्हशींचे मालक व फिर्यादी यांच्यात नुकसान भरपाई देण्याची बोलणी सुरू होती. जुबेर यांचे बोट फ्रॅक्‍चर झाले असून, ते संगणक अभियंता आहेत. त्यांना बोटामुळे काम करणे शक्‍य नसल्याने त्यांनी, म्हशींच्या मालकाकडे 1 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र ,म्हैस मालक फक्त 5 हजार देण्यास तयार होता. त्यामुळे त्यांनी तक्रार केली.

pune buffalo
दुचाकीवरील पती-पत्नी जखमी
author img

By

Published : Aug 26, 2021, 5:16 PM IST

Updated : Aug 26, 2021, 5:31 PM IST

पुणे - उधळलेल्या म्हशीने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे पती पत्नी जखमी झाले आहेत. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 8 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला असून, म्हशीचे मालक आणि जखमी व्यक्तींची नुकसान भरपाई देण्यावरून बोलणी सुरू होती. परंतु ही बोलणी फिसकटल्याने जुबेर अस्लम शेख (वय 38, रा. निलकंठ विहार) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शहनबाज अब्दुल रजाक कुरेशी, सदाकत कुरेशी आणी नदाफत कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही म्हशींचे मालक आहेत.

घटना सीसीटीव्हीत झाली कैद
पंधरा दिवसांपूर्वी (8 ऑगस्ट) तक्रारदार जुबेर हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी समोरुन म्हशी येत होत्या. यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली. व म्हशी जाण्याची वाट पाहत थांबले. मात्र, अचानक म्हशीने उधळून त्यांना व त्यांच्या पत्नीस जोरात धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. तर गाडीचे देखील नुकसान झाले आहे.

1 लाख नुकसानभरपाईची केली मागणी
म्हशींचे मालक व फिर्यादी यांच्यात नुकसान भरपाई देण्याची बोलणी सुरू होती. जुबेर यांचे बोट फ्रॅक्‍चर झाले असून, ते संगणक अभियंता आहेत. त्यांना बोटामुळे काम करणे शक्‍य नसल्याने त्यांनी, म्हशींच्या मालकाकडे 1 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र ,म्हैस मालक फक्त 5 हजार देण्यास तयार होता. त्यामुळे त्यांनी तक्रार केली. यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे लष्कर पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा - मुंबईच्या विद्यार्थीनीवर म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्कार, वाचा कोण काय म्हणाले...

Last Updated : Aug 26, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.