पुणे - सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नऱ्हे गावात एका हॉटेल चालकाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. शुक्रवारी (12 जून) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुनील लांगोरे (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खून झाल्याची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत सुनील लांगोरे एका गॅस एजन्सीमध्ये कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने नऱ्हे गावातील एका मोठ्या सोसायटीसमोर स्नॅक्स सेंटर सुरू केले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुनील लांगोरे हा आपल्या स्नॅक्स सेंटरसमोर उभा होता. यावेळी हातात कोयते घेऊन आलेल्या काही व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. कोयत्याने सपासप वार करीत हल्लेखोर पळून गेले.
दरम्यान, खून झाल्याची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. सायंकाळच्या वेळी खुनाची घटना घडल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली. हा खून कोणी केला? का केला? हे अद्याप समोर आले नाही. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा असा अंदाज आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पुण्यात हॉटेल चालकाचा खून.. कोयत्याने सपासप केले वार
सायंकाळच्या वेळी खुनाची घटना घडल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली. हा खून कोणी केला? का केला? हे अद्याप समोर आले नाही. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा असा अंदाज आहे.