पुणे - नवीन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि अनेक मोठे बदल घेऊन येत आहे. धनु राशीचे लोक सामान्यतः स्वभावाने थोडे भटके असतात. हे लोक आयुष्यातील सर्व नवीन आव्हाने सहजासहजी स्वीकारू शकत नाहीत आणि अनेकदा त्यामुळे अस्वस्थ होतात आणि या वर्षीही त्यांच्या बाबतीत असेच काही घडणार आहे. विशेषत: आरोग्यासंबंधात या वर्षात आपल्याला काही विशेष त्रास होणार नाही. परंतु असे असूनही, आपण आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कारण भूतकाळातील आपल्याला होणाऱ्या काही गंभीर आजारामुळे मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवन कसे असेल? -
वर्षाच्या सुरुवातीला धनू राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवनात सुखद बदल घडतील. तुम्हाला भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतील. तसेच तुम्ही घरातील लोकांसोबत धार्मिक यात्रेला जाऊ शकता. १३ एप्रिलनंतर, तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल पाहू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवू शकता. एप्रिलनंतर कुटुंबात शुभ कार्य होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या आईच्या आरोग्यात चांगले बदल दिसून येतील. आईशी तुमचे नातेही सुधारेल. या राशीचे लोक जे घरापासून दूर राहून काम करतात ते या वर्षी घराजवळ बदली करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यांना यात यश देखील मिळू शकते. वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे नाते दृढ होईल आणि तुम्हाला वडिलांच्या माध्यमातून लाभही मिळू शकतात.
प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल? -
वर्षाच्या सुरुवातीचा काळ प्रेम आणि वैवाहिक जीवनाबाबत चांगला राहील. प्रेम जीवनातील अडचणी दूर होतील. यादरम्यान धनू राशीचे काही लोक आपल्या प्रेयसीला लग्नासाठी राजी करू शकतात. एप्रिलनंतर तुम्हाला जोडीदारासोबत जुळवून घेण्यात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर प्रेम जिवनामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले, तर या वर्षात तुम्हाला वैवाहिक जीवनात सामान्य परिणाम मिळतील. एप्रिल ते जुलै हा काळ वैवाहिक जीवनासाठी चांगला राहील. यादरम्यान तुम्ही शनीच्या साडेसाती पासून मुक्त व्हाल. ज्यांते लग्न २०२१ च्या उत्तरार्धात किंवा २०२१ च्या सुरुवातीला झालेले आहे, त्या लोकांच्या आयुष्यात या वर्षी नवीन पाहुणे येऊ शकतात.
करिअर आणि शिक्षण कसे असेल? -
विद्यार्थी वर्गाला या वर्षी आळस झटकून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. तरच तुमची प्रगती होऊ शकते. त्यामुळे अभ्यासावर भर द्यावा. करिअरच्या दृष्टीने २०२२ वर्षाचे पहिले चार महिने चांगले असतील. परंतु तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात सावध राहावे लागेल. हे वर्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सामंजस्याने चालत असाल, तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. या राशीच्या लोकांना संगणक, रेडिओलॉजी, शस्त्रक्रिया यासारखे काम करणाऱ्यांना लाभ मिळू शकतात. धनू राशीच्या त्या लोकांनाही या वर्षी त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. जे योग-ध्यानाशी संबंधित शिक्षण देतात. या राशीच्या ज्या लोकांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे, त्या लोकांना नोकरीही मिळू शकते.
आर्थिक जीवन कसे असेल? -
या वर्षी आर्थिक बाजू चांगली राहण्याची अपेक्षा आहे, या राशीच्या लोकांना या वर्षी गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. पण तुम्हाला हुशारीने गुंतवणूक करावी लागेल. या राशीचे काही लोक संपत्ती जमा करण्यासाठी जोडीदाराची मदत घेऊ शकतात. त्याच वेळी, वडिलोपार्जित मालमत्तेतही या वर्षी वाढ होऊ शकते. कारण या वर्षी जर तुमची आई नोकरी व्यवसायाशी संबंधित असेल, तर तिची या वर्षी पदोन्नती होऊ शकते. वर्षाच्या मध्यात या राशीच्या काही लोकांना घराच्या सामानावर पैसा खर्च करावा लागू शकतो. काही लोक वाहन इत्यादींवर पैसे खर्च करू शकतात.
आरोग्य कसे असेल? -
भौतिकदृष्ट्या यावर्षी धनू राशीच्या लोकांच्या आरोग्यात चांगले बदल होतील. मात्र, या वर्षी तुम्हाला काही मानसिक समस्या येऊ शकतात. योगसाधना करून तुम्ही या वर्षी अनेक मानसिक समस्या टाळू शकता. एप्रिल ते जुलै हा काळ आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असू शकतो. या काळात तुम्ही उत्तम जेवणाचा आस्वाद घ्याल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत, आपण दिनचर्या सुधारून चांगले आरोग्य राखू शकता.