ETV Bharat / city

वेल्हा तालुका नामांतरासाठी इतिहास प्रेमींचे अभियान - सुप्रिया

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नामांतर राजगड असे व्हावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सूळे यांनी केली होती. यानंतर या नामांतरासाठी आता इतिहास प्रेमींकडून अभियान चालवण्यात येत आहे.

वेल्हा तालुका नामांतरासाठी इतिहास प्रेमींचे अभियान
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:16 PM IST

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजगड तालुक्याची काही ऐतिहासिक कागदपत्रे समोर आली आहेत. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नामांतर स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगड या नावाप्रमाणे करण्यात यावे, यासाठी इतिहास प्रेमींकडून आता अभियान राबविण्यात येत आहे.

ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये वेल्हा तालुक्याचा राजगड असा उल्लेख

पुणे जिल्ह्यातील दुर्गम आणि ऐतिहासिक तालुका म्हणून ओळख असलेला वेल्हा तालुका हा एकेकाळी हिंदवी स्वराज्याच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू होता. मात्र या प्रदेशाचे ऐतिहासिक नाव राजगड असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजगड तालुक्याचे ऐतिहासिक दस्ताऐवज पाहता वेल्हा तालुक्याचे नामांतर करावे अशा जोरदार मागणी करण्यात येत आहे. यासाठी इतिहास प्रेमींकडून अभियान सुरू करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच या प्रदेशाच्या खासदार सुप्रिया सूळे यांनी ट्विटरवरून हि मागणी केली होती.

  • हे सर्व मुद्दे लक्षात घेता @CMOMaharashtra वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती. (४/४)

    — Supriya Sule (@supriya_sule) July 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. (२/४)

इतिहास प्रेमींना काही ऐतिहासिक कागदपत्रे मिळाली आहेत. यात सन 1713 मध्ये या प्रदेशाचा राज्यकारभार राजगड तालुक्याच्या नावाने सुरू असल्याची नोंद दस्तऐवजांमध्ये आहे. त्यामुळे ऐतिहासिक वेल्हा तालुक्याचे नामकरण राजगड या ऐतिहासिक नावाने करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा...

वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करा; खासदार सुळेंची ट्विटद्वारे मागणी

Intro:पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजगड तालुक्याची  ऐतिहासिक कागदपत्रे समोर आली आहेत. सध्या या तालुक्याची ओळख वेल्हा अशी असून, स्वराज्याच्या राजधानीचे नाव पुन्हा राजगड करण्यात यावे, यासाठी इतिहास प्रेमींकडून अभियान राबविण्यात सुरू करण्यात आले आहे.Body:पुणे जिल्ह्यातील दुर्गम आणि ऐतिहासिक तालुका म्हणून ओळख असलेला वेल्हा तालुका हा एकेकाळी हिंदवी स्वराज्याच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू होता. मात्र, या प्रदेशाचे ऐतिहासिक नाव राजगड असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत.

यासंदर्भात इतिहास प्रेमींना ऐतिहासिक कागदपत्रे मिळाली असून, सन 1713 मध्ये या प्रदेशाचा राज्यकारभार राजगड तालुक्याच्या नावाने सुरू असल्याची नोंद दस्तऐवजांमध्ये आहे. त्यामुळे इतिहास वेल्हा तालुक्याचे नामकरण राजगड या ऐतिहासिक नावाने करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.