पुणे : पुणे शहरातील पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी हे जसे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुढे ( Officers and Employees of Pune City Police Force ) असतात. तसेच, या व्यतिरिक्त विविध क्रीडा प्रकारातदेखील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी हे पुढे असतात. पुणे पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी नुकतेच ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माउंट कोजीअस्को शिखर ( Mount Kojiasco is Highest Peak in Continent ) सर केले आहे. हे शिखर सर करणारे महाराष्ट्र पोलिस दलातील ते पहिले अधिकारी आहे.
सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मानस : माझा मिशन सेवन समिट, जगातील सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे सर करण्याच्या मोहिमेतील हे चौथे शिखर असून, 23 मे 2021 जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर जगातील सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे एका वर्षामध्ये सर करण्याचा मानस केला. त्यानुसार 26 जुलै 2021 रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट Elbrus सर केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2021 रोजी अफ्रिका खंडांतील सर्वोच्च शिखर माउंट Kilimanjaro शिखर सर केले.
लागोपाठ तीन शिखरे पादाक्रांत करण्याचा मानस : शिखर सर केल्यानंतर त्यांनी याबाबतचा मानस व्हिडीओद्वारे व्यक्त केला. लागोपाठ तीन शिखरे पादाक्रांत केल्यानंतर मानस एका वर्षामध्ये पूर्ण होईल, अशी आशा होती. परंतु, त्यानंतर कोरोनाची आलेली तिसरी लाट, तसेच कोविड संपल्यानंतर परदेशवारी करणाऱ्या लोकांची वाढलेली संख्या असा अनेकविध कारणामुळे व्हिसा मिळण्यात अडचणी येत गेल्या. परिणामी गेल्या वर्षभरात एकही शिखर मोहीम करता आली नाही, असे यावेळी गुरव यांनी सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया खंडातील न्यू साऊथ वेल्स हे शिखर सर : ऑस्ट्रेलिया खंडातील न्यू साऊथ वेल्स या राज्यातील या शिखरावर सामान्यतः डिसेंबर ते मार्च यादरम्यान उन्हाळ्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये दोनच ऋतू मानले जातात. चढाई केली जाते. परंतु, आम्ही हे शिखर थंडीमध्ये सर करण्याचे ठरवले. खरं तर सेव्हन समिटमधील सर्वात कमी उंचीचे आणि त्यामुळे सर्वात सोपे शिखर म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु, थंडीमध्ये हे शिखर सर करणे थोडे अवघड होते. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे आणि वेगाने वारे वाहत असल्याने दृश्यमानता कमी होते आणि परिणामी वातावरणातील तापमानसुद्धा उणे 10 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्यामुळे कोणताही पर्वत हा छोटा किंवा मोठा म्हणून गृहीत धरता येणार नाही. त्यासाठी पूर्वतयारीसुद्धा आवश्यकच असते. तशी तयारी करून हे शिखर सर केले आहे, असेदेखील गुरव यांनी सांगितले.