ETV Bharat / city

Difference Between Corona And Monkeypox : कोरोना आणि मंकीपॉक्स आजारांमधील फरक काय? वाचा... - bats

जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना व्हायरसच्या ( Corona virus ) काळात आत्ता मंकीपॉक्सच्या ( Monkeypox ) संसर्गामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कोविडची चिंता संपली नाही तोच आता मंकीपॉक्सचा प्रसार हा चिंतेचा विषय झाला आहे. या प्राणघातक विषाणूने आता 30 देशांमध्ये पंख पसरले असून अनेक प्रकरणे आत्ता या मंकीपॉक्सचे समोर येत आहे.

Avinash Bhondve - Former President IMI
अविनाश भोंडवे - माजी अध्यक्ष आयएमआय
author img

By

Published : Jul 19, 2022, 5:37 PM IST

पुणे - जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना व्हायरसच्या ( Corona virus ) काळात आत्ता मंकीपॉक्सच्या ( Monkeypox ) संसर्गामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कोविडची चिंता संपली नाही तोच आता मंकीपॉक्सचा प्रसार हा चिंतेचा विषय झाला आहे. या प्राणघातक विषाणूने आता 30 देशांमध्ये पंख पसरले असून अनेक प्रकरणे आत्ता या मंकीपॉक्सचे समोर येत आहे. कोरोना ( Corona ) आणि मंकीपॉक्समध्ये फरक काय आहे हे आज जाणून घेऊयात.

अविनाश भोंडवे - माजी अध्यक्ष आयएमआय

अशी झाली सुरवात - जगात जानेवारी 2020 मध्ये जगभरात कोरोना व्हायरसचा उगम झाला आणि जगातील 185 देशांमध्ये या विषाणू पसरला आणि जगभरात दहशत माजवली. कोरोना व्हायरसचा आत्ता जगभरात संसर्ग कमी होत असताना मंकीपॉक्स या आजाराचा उगम झाला आहे ( Monkeypox Spreading ). मुळात मंकीपॉक्स हा नवीन आजार नसून हा आजार खूप जुना आजार आहे.ज्या वेळेस देवी किंवा स्मॉलपॉक्स हा आजार जो 1980 साली जगातून नष्ट झाला.आणि आत्ता याच जातीचा हा आजार जगभरात पसरत आहे.अशी माहिती यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशनचे ( Indian Medical Association ) माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी दिली.

म्हणून मंकीपॉक्स नाव ठेवले - सुरवातीला काही माकडांच्या जातींमध्ये ( monkeys Breeds ) हा आजार पसरला गेला. म्हणून याला मंकीपॉक्स अस म्हटल गेलं. परंतु तो काही वेळानंतर हा आजार प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरू लागला.या आजाराची सुरवात ही 1976 साली काँगो मध्ये या आजाराची मोठी साथ आली होती.आणि परत 1997 साली काँगो बरोबर अनेक देशांमध्ये याची साथ आली.आणि आज हा जगभरातील विविध शहरांमध्ये पसरताना पाहायला मिळत आहे.

कोरोना आणि मंकीपॉक्समध्ये आहेत हे फरक - कोरोना आजाराची या मंकीपॉक्स च विषाणू म्हणून साम्य असल तरी कोरोनाचा विषाणू वटवागूळ पासून ( bats ) माणसांमध्ये आलेला आहे. आणि हा मंकीपॉक्स देखील प्राण्यांमधून माणसांमध्ये आलेला आजार आहे. या दोघांच्याही लक्षणांमध्ये मोठं फरक असून कोरोनामध्ये सर्दी, खोकला, ताप येतो आणि मंकीपॉक्स या आजारामध्ये ज्या वेळेस याचा विषाणू शरीरात प्रवेश करतो. तेव्हा तीन दिवसांनी ताप येतो.आणि सर्दी खोकला ताप हे येतच पण त्या माणसाच्या शरीरावर एक प्रकारे पुरळ उठते आणि ही पुरळ वाढत जाते आणि त्याची फोड होते.त्यात पाणी भरल जातं.आणि नंतर त्यात पू भरल्यासारखी पिवळसर होतात.आणि मग याच्या खपल्या बनतात आणि ते पुढे झडतात.हे सर्व व्हायला किमान 12 ते 15 दिवस लागतात.याचा त्रास ही होतो आणि हा गंभीर ही होत जातो.

असा पसरतो हा आजार - कोरोनामध्येही विषाणू हा शरीरात शिरल्यानंतर शरीरातील विविध अवयावांमध्ये जातो. कोरोना विषाणू हा हवेतून पसरत असतो. आणि मंकीपॉक्स हा आजार देखील खोकला आणि शिंकांमधून पसरला जातो. पण या आजारात ज्या पुरळ असतात त्यामध्ये जे पाणी असते. किंवा ज्या खपल्या असतात त्याला स्पर्श केल्याने देखील हा आजार पसरला जातो.

दोन्ही आजारांमध्ये अजूनही औषधोपचार नाही - या दोन्ही आजारांमध्ये विशेष म्हणजे दोन्ही आजारांना अजूनही औषधोपचार तयार झालेले नाहीत. कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी कुठलही औषध तयार झालेली नाहीत. तर मंकीपॉक्सला याआधी जे औषधोपचार वापरले जात होते. त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. त्यामुळे या आजारावर देखील संशोधन सुरू आहे. कोरोनावर लस तयार झालेली आहे. पण ही लस सध्या जे नवीन सब व्हेरीयंट आहे. त्यावर ही लस प्रभावी ठरत नाहीये. पण मंकीपॉक्सच्या आजारावर अजूनही लस तयार केलेली नाही. देवीची लस जेव्हा 1980 साली हा आजार नष्ट झाला तेव्हा दोन ते तीन वर्षांमध्ये ही लस देणं बंद केले. त्यामुळे याची लस नाहीये. पण यावर संशोधन सुरू असल्याचं यावेळी भोंडवे यांनी सांगितल. कोरोंनामध्ये मृत्यूचा प्रमाण दोन ते अडीच टक्के असून तर मंकीपॉक्समध्ये मृत्यूचा प्रमाण हा कमी असून तो एक ते दीड टक्का आहे.

हा आजार वेगाने पसरणार नाही - विशेष म्हणजे कोरोना ज्या वेगाने पसरतो त्या वेगाने हा मंकीपॉक्स पसरत नाही. भारतात जरी या आजाराचे रुग्ण सापडले असेल तरी हा आजार वेगाने पसरणारा नाही. रुग्ण वाढतील पण हा आजार कोरोना सारखा पसरणारा नाही. असे देखील यावेळी भोंडवे यांनी सांगितले.

हेही वाचा - attack on nupur sharma supporter: सीतामढीमध्ये नुपूर शर्मा यांचा व्हिडिओ पाहत असताना तरुणावर चाकूने हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.