पुणे - शहरात शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) दुपारी परतीच्या पावसाने काही वेळ जोरदार हजेरी लावली. भर दुपारी शहरात ढगांचा काळोख दाटून आला होता. वादळी वाऱ्यासह शहरातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला.
पुण्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी दरम्यान, पावसाचा परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जो आंध्रप्रदेशमार्गे पुढे सरकत आहे. यामुळे येत्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबरनंतर अंदमान बेटांच्या भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास पुन्हा त्यानंतर देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा - सीबीएसई बोर्डात शिका, अन्यथा शाळा सोडा; एमआयटीने विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठवले दाखले