पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी आरोग्य कर्मचारी सर्वात आघाडीवर होते. परंतु, त्यांच्यावरच महानगरपालिकेपुढे ठिय्या मांडून उपोषण करण्याची वेळ आली आहे. कोविड काळात जीवावर बेतून काम करणाऱ्या 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने एकूण पाचशेपेक्षा अधिक कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामावर पुन्हा रुजू करावे, अशी मागणी करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापाालिकेसमोर ठिय्या मांडला आहे.
हेही वाचा-राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू, सरकारकडून नवीन नियमावली जारी
कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचारी होते सर्वात आघाडीवरपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोविड रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये वॉर्ड बॉय व नर्स यांच्यासह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना महानगर पालिकेने कंत्राटी पध्दतीने कामावर रुजू केले होते. त्यांनीदेखील रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत कोविड आणि इतर रुग्णांची सेवा केली. परंतु, त्यांचे नुकतेच सहा महिन्यांचे कंत्राट संपले. त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी वंदना वाघमारे यांनी उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. कायमस्वरुपी कामावर रुजू करावे, अशी मागणी आरोग्य कर्मचारी काजल ब्राम्हणे यांनी केली आहे.हेही वाचा-रामोजी फिल्म सिटी १८ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी होणार खुली
दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांची भेट घेतली आहे. सर्व कोविड योद्धे हे उपोषण सुरू ठेवण्यावर ठाम आहेत.