ETV Bharat / city

Tanhaji Sawant : आमचा दसरा मेळावा दहा लाखांच्यावर होणार, लोकं स्वखुशीने मेळाव्याला येणार: तान्हाजी सावंत - तानाजी सावंत दसरा मेळाव्यावर विधान

आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत लोकं हे स्वखुशीेने आमच्या दसरा मेळाव्याला येणार आणि आमचा दसरा मेळावा दहा लाखांच्यावर होणार आहे, (Tanhaji Sawant statement in Pune On Dasara Melava) म्हणाले. एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे आयोजित 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचा शुभारंभ आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत (Tanhaji Sawant statement) होते.

Health Minister Tanhaji Sawant
आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत
author img

By

Published : Sep 28, 2022, 5:13 PM IST

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यंदा दसरा मेळावा घेणार असून, शिंदे गटातील कोणत्याही आमदाराला आपापल्या मतदार संघातून लोकांना घेऊन येण्याची जबाबदारी म्हणजेच टार्गेट देण्यात आलं आहे, अशी टीका विरोधक करत आहे. यावर आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, अशी कोणतीही जबाबदारी कोणावरही देण्यात आलेली नाही. लोकं हे स्वखुशीेने आमच्या दसरा मेळाव्याला येणार आणि आमचा दसरा मेळावा दहा लाखांच्यावर होणार आहे, असं यावेळी सावंत (Tanhaji Sawant statement in Pune On Dasara Melava) म्हणाले.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान - एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे आयोजित 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचा शुभारंभ आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रुबी ओझा आदी उपस्थित होते, यावेळी ते बोलत (Tanhaji Sawant statement in Pune) होते.

प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत

राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार, असा यावेळी डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. घरातील महिला कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत असते. कुटुंबासाठी झिजताना तिचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण, शहरी, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सर्व महिलांची स्थिती साधारण हीच असते. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची चिंता करण्यासाठीच राज्यातील मातांसाठी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील शेवटच्या महिलेची आरोग्य तपासणी होईपर्यंत हे अभियान सुरू राहील, असं देखील यावेळी सावंत (Health Minister Tanhaji Sawant) म्हणाले.

सावंतांना शिंदे गटातुनही साईडलाईन केलं जातंय का ? सध्या राज्यातील घडामोडी तसेच सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्ताराचा दुसरा टप्पा कधी होणार ? याबाबत सावंत यांना विचारलं असता ते म्हणाले, हा प्रश्न शिंदे-फडणवीस यांना विचारलं पाहिजे. सरकारमधील मी एक पार्ट ॲण्ड पार्सल आहे. तसेच यावेळी सावंत यांना पक्षात काय सुरु आहे ? याबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला ‘मला माहिती नाही’ असेच उत्तर दिले. यावरून मंत्री तानाजी सावंत यांना शिंदे गटातुनही साईडलाईन केलं जातंय का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, बाळासाहेबांची सावली असलेले थापा तुमच्याकडे आलेत या प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता ‘मी अजून बघितलंच नाही’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया मंत्री सावंत यांनी दिली.

गरजू रुग्णांना तात्काळ नियंत्रण कक्ष - ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाला १०४ क्रमांकावर संपर्क करताच, अर्ध्या तासात आरोग्य कर्मचारी रुग्णापर्यंत पोहोचेल आणि प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नेण्यात येईल. लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याचे माहिती डॉ. सावंत यांनी (Tanhaji Sawant statement On Dasara Melava) दिली.

माता-भगिनींना 'आभा' आरोग्य ओळखपत्र - माता-भगिनींना 'आभा' आरोग्य ओळखपत्र देण्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्यांना टॅब देण्यात येणार आहे. महिलेच्या आरोग्याबाबत सर्व माहिती या टॅबमध्ये संकलित करण्यात येईल व त्याला पुढील टप्प्यात आरोग्य ओळखपत्राशी जोडण्यात येईल. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अधिक सुलभ होईल. सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती, नागरिकांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री महोदयांच्या हस्ते चष्मे आणि 'आभा' आरोग्य ओळ्खपत्राचे वितरण करण्यात आले. आरोग्य भित्तीपत्रक आणि आरोग्यपत्रिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून नेत्रविकार आढळलेल्या विद्यार्थ्यांना चष्मे वाटप केल्याबद्दल डॉ. सावंत यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.