ETV Bharat / city

Health Department Paper Leak : आरोग्य विभाग गट 'क'चाही पेपर फुटलाच, गुन्हा दाखल; २ जण अटकेत - टीईटी पेपरफुटी

राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीसाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षांचे पेपर सातत्याने फुटत ( Health Department Paper Leak ) असल्याचे समोर येत आहे. गट ड परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आता गट क परीक्षेचा पेपरही फुटलाcccc. याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ जणांना अटक करण्यात आली ( 2 Arrested In Health Department Papers Leak ) आहे.

आरोग्य विभाग गट क चाही पेपर फुटलाच
आरोग्य विभाग गट क चाही पेपर फुटलाच
author img

By

Published : Dec 28, 2021, 5:17 PM IST

पुणे- आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गट 'ड' च्या परीक्षेचा पेपरफुटी ( Health Department Paper Leak ) झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आत्ता गट 'क' चा देखील पेपर फुटला ( Health Department Group C Paper Leak ) असल्याचं निष्पन्न झालं आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांनी ( Pune Police ) काल रात्री उशिरा तक्रार दाखल केली असून, आत्तापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली ( 2 Arrested In Health Department Papers Leak ) आहे. आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर ( CEO Smita Karegaonkar ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत 2 जणांना अटक केली आहे.

१८ आरोपी अटकेत

या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १८ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये महेश बोटले सहसंचालक आरोग्य विभाग, प्रशांत बडगिरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संदीप जोगदंड यांच्यासह आरोग्य विभागातील इतर कर्मचारी, पेपर फोडून पुरविणारे एजंट व काही परीक्षार्थींच्या समावेश आहे. या परीक्षेत शंभर पैकी 93 प्रश्न परीक्षेपूर्वीच फुटून समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींकडून तांत्रिक पुरावे प्राप्त झाले आहेत. तसेच या प्रकरणात न्यासा कम्युनिकेशनचे ( Nyasa Communication ) देखील नाव पुढे येत आहे.

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोग्य पेपरफुटी म्हाडा त्यानंतर टीईटी पेपरफुटी ( TET Exam Paper Leak ) प्रकरण समोर आल्यानंतर पुणे पोलिसांच्यावतीने लोकांना पेपर फुटीबाबत अधिक माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार निशीद गायकवाड याने काही लोकांच्या मदतीने आरोग्य विभाग गट क पदाचे परीक्षेचे पेपर्स परीक्षेपूर्वी फोडून एजंट द्वारे पैसे स्वीकारून परीक्षार्थीकडे पेपर प्रसारित केल्याची माहिती मिळाली. याची माहिती केली असता त्यात तथ्य आढळल्याने आरोग्य विभागात पत्राद्वारे या पेपरफुटी संदर्भाने कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यासाठी कळविण्यात आले. त्याप्रमाणे मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पेपर फोडणारे महेश बोटले, प्रशांत बडगिरे, डॉक्टर संदीप जोगदंड, राजेंद्र सानप, निशित रामहरी गायकवाड, राहुल धनराज लिंघोटे व इतर यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात निशीद गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल धनराज लिंघोटे यांचा या गुन्ह्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

न्यासा कम्युनिकेशनचे नाव येत आहे समोर
आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा त्यानंतर टीईटी पेपर फुटी झाली. या परीक्षा पेपरफुटी प्रकरणात जी ए टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर या कंपनीचा नाव त्याच पद्धतीने या कंपनीतील अधिकाऱ्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मात्र आता आरोग्य विभागाची पेपरफुटी निष्पन्न झाल्यानंतर न्यासा कम्युनिकेशनचे देखील नाव समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.