पुणे - आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ काही थांबण्याचा नाव घेत नाही. पहिल्यांदा परीक्षांच्या तारख्या बदलण्यात आल्या, त्यानंतर मागच्या आठवड्यात झालेल्या परीक्षेत देखील परीक्षा 11 वाजता असताना विद्यार्थ्यांना साडेबारा वाजता पेपर देण्यात आले. त्यानंतर आज झालेल्या गट 'ड' चा पेपर हा एक दिवसाआधीच फुटला असल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून आरोग्य विभागाच्या कामगिरीवर प्रश्न उपास्थित केले जाते आहेत.
हेही वाचा - पुण्यातील महात्मा फुले मंडईत नागरिकांची तुफान गर्दी; लोकांना कोरोनाचा विसर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच, या भरतीची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी आणि या घेतलेल्या परीक्षा रद्द करून परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात याव्या, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने संवाद साधला.
हेही वाचा - किरण गोसावीवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल