पुणे - राज्य सरकारच्या वतीने मुस्लिम समाजचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे . याबाबत मंत्री अब्दुल सत्तार ( Minister Abdul Sattar ) यांना विचारले असता ते म्हणाले की सच्चर कमिटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचा पहिला सर्वेक्षण करण्यात आला होते. त्यानंतर कोणत्याही प्रकारच सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. प्रत्येक समाजात गरिबी असून प्रत्येक सामजाच सर्वेक्षण व्हायला पाहिजे. म्हणून आत्ता मुस्लिम समाजच सर्वेक्षण होत आहे. यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले. सुपर मार्केट मधे वाईन विक्री बाबत भाजपला मान्य करणार का याबाबत सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की शेतकऱ्यांना जिथे फायदा होत असेल तर परवानगी मध्ये काही शितल आणण्यात येईल का? असा प्रस्ताव आला की निश्चित शेतकऱ्यांच्या हितासाठी नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे विचार करतील ते नेहमी शेतकऱ्यांना बाबत विचार करत आले आहे असे देखील यावेळी सत्तार ( Abdul Sattar ) म्हणाले.
मला हटवण्यासाठी हे ब्लॉकमेलिंग - टीईटी बाबत सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की जेव्हा नाव आल तेव्हाच मी मुख्यमंत्री यांना पत्र दिले आणि त्यांनी लगेच कमिटी नेमली. त्यांनी चौकशी केली. आमच्या कुठल्याही परिवाराचा संबंध आहे का अस पत्र दिले जेव्हा ते समोर येईल तेव्हा मी स्वतः हा ते सादर करेल. माझ्या जे एक मुलीचा जो पगार सुरू आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टचा आदेश आहे. आणि माझा मुलगा हा कधीच परीक्षेला बसलेला नाही. माझ्या कोणत्याही मुलीचे टीईटी घोटाळ्याशी संबंध असेल तर मी लगेच सांगेल. मला हटवण्यासाठी हे ब्लॉकमेलिंग ( Blockmailing ) आहे. आणि तो 24 च्या आधीच 22 ला आला आहे. अस स्पष्टीकरण यावेळी सत्तार यांनी दिले.
आदित्य ठाकरेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका - शिक्षण विभागाच्या माध्यमातून जी यादी देण्यात आलेली आहे. ज्यात माझ्या मुलींचे नाव आहे ती यादी फेक असून माझ्या मुलीचं पगार हे येण्याच्या आधीच 2020 मध्येच बंद झाली होते. तुम्हाला जर अँगेल च वेगळे करायचे असेल तर याच उत्तर भगवान देऊ शकतो. असे यावेळी सत्तार म्हणाले. वेदांत फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील रोजगार पळवल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-अंधेरी सी लिंक कामासंबंधीच्या मुलाखती या देखील चेन्नईमध्ये घेतल्या जात असल्याचा खुलासा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे भूमीपुत्रांच काय? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यावे असही खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. त्यावर सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की आश्चर्य वाटतंय, गुजरात सरकारने ज्या सुविधा त्या आपण द्यायला हव्या होत्या. खरंतर आधीच्या सरकारमध्ये मी होतो. आदित्य ठाकरे होते. सामूहिक जबाबदारी होती .आम्ही कमी पडलो. मागच्या सरकारने 2 वर्ष काहीच केले नाही. माजी मंत्री सुभाष देसाई ( Minister Subhash Desai ) आमचाही रामराम घेत नव्हते. आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे.अस यावेळी सत्तार म्हणाले.