पुणे - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम अद्याप शिथील केले नसताना, राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र सायकल पटू निरुपमा भावेंच्या तोंडावरचा मास्क हटवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यपालांना कोरोना निर्बंधांचा विसर पडला की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शुक्रवारी सकाळी कोथरूडमध्ये सायकल रॅली आणि त्यात सहभागी झालेल्या विजेत्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते व्यासपीठावर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचवेळी रॅलीत सहभागी होणाऱ्या निरुपमा भावे या सायकलपटूचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते होत होता. कोरोना नियमांचे पालन म्हणून भावे यांनी व्यासपीठावर येताना तोंडावर मास्क लावलेला होता. मात्र, राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी फोटो काढताना स्वता: राज्यपाल कोश्यारींनी चक्क भावे यांच्या तोंडावरचा मास्क हटवला आणि फोटो काढायला लावला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.
राज्यपालांच्या तोंडावर होता मास्क-
वास्तविक कोरोना सांसर्गाच्या या काळात सार्वजनिक कार्यक्रमांवर काही मर्यादा आहेत. सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येवर मर्यादा आहेत, त्यातही कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावणे हा कोविड काळातील मूलभूत नियम झाला आहे. मात्र अशावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी मात्र स्वत:च्या तोंडावरचा मास्क हटवला नाही. मात्र, भावे यांच्या तोंडावरचा मास्क हटवल्याने ही कृती कितपत योग्य आहे, अशी चर्चा होत आहे.
हेही वाचा - साकीनाका घटनेतील आरोपींना लवकर फाशी द्या- महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा - रुग्णसंख्या किंचित घटली; राज्यात ३ हजार ५९५ नवे रुग्ण, ४५ मृत्यू