ETV Bharat / city

'राज्यात कोरोना चाचण्या वाढवा, महापालिकांना भरघोस मदत करा' - देवेंद्र फडणवीस पुणे दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) पुणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले आहे.

opposition leader devendra fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 23, 2020, 8:16 PM IST

पुणे - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) पुणे शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मुख्य रुग्णालयांची पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच राज्य सरकारने कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले आहे.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्या सोबत येण्याची इच्छा होती. त्यासाठी चर्चाही झाल्या होत्या. मात्र, वरिष्ठांनी शिवसेनेसोबत राहण्यास सांगितले होते. त्यामुळे ते प्रकरण तसंच राहुन गेलं, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

हेही वाचा... आमची बांधिलकी जनतेशी... कधी 'सिल्व्हर ओक' तर, कधी 'मातोश्री'वर अस्वस्थ येरझारा घालत नाही!

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर काही सूचना मांडल्या. सरकारने अधिकाधिक कोरोना टेस्ट करण्याची गरज आहे. तसेच राज्याच्या प्रमुखांनी समन्वय साधला पाहिजे. कोरोना बरोबर लढताना सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे, असे ते म्हणाले. राज्य सरकारने महानगरपालिकांना कोरोनाच्या लढ्यासाठी मदत करावी. पुण्यात एनआयव्ही सारखी संस्था आहे. मात्रस पुण्यात त्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सध्या अग्रेसिव्ह टेस्टिंग मोडवर आहे. मात्र, आपल्याकडे कोरोना टेस्टिंग कमी आहे. या स्थितीत कमी टेस्टिंग करणे घातक आहे. कोरोनाच्या या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आवश्यक आहे. अद्याप पुण्यासारख्या शहरात अतिरिक्त टेस्टिंगची सोय नाही. हे बरोबर नाही, त्यामुळे पुण्यात टेस्टिंग वाढवण्याची गरज असून तशी विनंती मी सरकारला करत आहे, असे सांगत फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या पथकाने देखील महाराष्ट्रात टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या, याची आढवण करुन दिली.

पुण्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता येते अधिक लक्ष देण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयामध्ये जर कोणी नफेखोरी करत असेल, तर त्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आता कोणाचे मूल्यमापन करण्याची वेळ नाही, मात्र सर्वात मोठी व्यवस्थापनात्मक चूक म्हणजे आकडे कमी दाखवण्याच्या नादात टेस्टिंग कमी केली जात आहे. या काळात सरकारने विश्वासात घेतले नाही घेतले, तरी जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्याच्यासाठी जे करायचे ते करू, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

हेही वाचा.... परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही शाळा सुरू होणार नाही - अजित पवार

लॉकडाऊन पुन्हा सुरू करता येईल असे वाटत नाही, लोकांची तशी मानसिकता नाही : फडणवीस यांचा पिंपरी-चिंचवड दौरा

कोरोनाशी मुकाबला करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे, असे आरोप करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनामुळे पालिकेला बरेच यश आल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोनाशी कसा मुकाबला केला जातो आहे, याची माहिती घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना राज्यात लॉकाडऊन पुन्हा सुरू करता येईल, असे वाटत नसल्याचे म्हटले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पातळीवर राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना, डॅशबोर्डद्वारे चांगले कार्य सुरू आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर पावसाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याने त्या अनुषंगाने पावले उचलणे गरजेचे आहे. लॉकडाऊन पुन्हा सुरू करणे हा पर्याय नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस हे उद्या सोलापूरचा दौरा करणार आहेत. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. 'टप्याटप्याने आपण इतरही ठिकाणी जिथे जास्त रुग्ण आहे, अशा ठिकाणी जाणार आहोत. याशिवाय पक्षाचे पदाधिकारी देखील जाणार आहेत. केंद्रीय मंत्री देखील सदर भागात जाणार आहेत.' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच या दौऱ्यामागचा हेतू हा केवळ तिथल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवता कशा येतील, याशिवाय त्या सरकारपर्यंत कशा पोहोचवता येतील असाच प्रयत्न असणार आहे, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.