ETV Bharat / city

पार्थ पवार भाजपात येत नाही आणि भाजपही त्यांना पक्षात घेत नाही - खासदार गिरीश बापट - खासदार गिरीश बापट पार्थ पवार

'सुरू असलेला वाद हा त्यांचा कौटुंबिक विषय असून त्यात आम्ही पडत नाही. त्यांनी तो कुटुंबातच सोडवावा, जय श्रीराम असे एकटे पार्थच नाही तर अख्ख जग म्हणतं.' असेही बापट यावेळी म्हणाले.

गिरीश बापट
गिरीश बापट
author img

By

Published : Aug 16, 2020, 7:07 PM IST

पुणे - 'पार्थ पवार काही भाजपात येत नाही आणि भाजपही काही पार्थ पवार यांना घेत नाही.' असे विधान पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. पुण्यात नृत्य परिषद महाराष्ट्र संस्थेच्यावतीने पुणे शहरातील गरजू नृत्य कलाकारांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप खासदार गिरीषजी बापट व संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट बोलत होते.

गिरीश बापट यांची प्रतिक्रिया

सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अनेकांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीसंदर्भात बोलताना शरद पवार यांनी पार्थ पवार यांनी, 'पार्थ पवार इमॅच्युअर आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही.' अशा शब्दात फटकारले होते. तेव्हापासून पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा आहे.

पुण्यात स्वतंत्रदिनानिमित्त नृत्य परिषद संस्थेच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात खासदार गिरीश बापट यांना पार्थ पवार विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार गिरीश बापट यांनी हे विधान केले आहे. तसेच हा त्यांचा कौटुंबिक विषय असून, त्यात आम्ही पडत नाही. त्यांनी तो कुटुंबातच सोडवावा, जय श्रीराम हे एकटे पार्थच नाही तर अख्ख जग म्हणतं. असेही बापट यावेळी म्हणाले.

हेही वाचा - ..तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.