ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅसगळती होऊन भीषण स्फोट; एकाचा मृत्यू तर 12 जण जखमी - पिंपरी चिंचवडमध्ये स्फोट

अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिघी परिसरात महादेव नगर येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये ज्ञानेश्वर टेमकर यांच्या राहत्या फ्लॅट नंबर 102मध्ये रात्रभर घरगुती सिलेंडरमधून गॅसगळती झाली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास विजेची उपकरण सुरू करण्यास गेल्यानंतर गॅसचा भीषण स्फोट झाला. यात शेजारील फ्लॅटलादेखील स्फोटाची तीव्रता जाणवली.

गॅस गळती होऊन भीषण स्फोट
गॅस गळती होऊन भीषण स्फोट
author img

By

Published : Aug 9, 2020, 1:50 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरामध्ये रात्रभर घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाली. यामुळे झालेल्या भीषण स्फोटात एका मृत्यू तर 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली अशी माहिती अग्निशामक दलाच्या विभागाने दिली आहे. दरम्यान, स्फोट अत्यंत भीषण असल्याने दोन फ्लॅटच्या भिंतींचेदेखील नुकसान झाले असून दरवाजे तुटले आहेत तर खिडक्या ग्रीलसह निखळल्या आहेत. घरातील साहित्याचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या घटनेत ज्ञानेश्वर टेमकर, मंगला टेमकर (वय 27), अनुष्का टेमकर (वय 7), यशश्री टेमकर (वय २) आणि त्यांच्या घरात सातपुते नावाचे नातेवाईक आले होते, त्यांची दोन मुले आणि पती पत्नी जखमी झाले आहेत. संबंधितांची नावे फ्लॅट नंबर 102 मधील आहेत. तर फ्लॅट नंबर 103मध्ये महेंद्र सुरवाडे, अर्चना सुरवाडे (वय 35), आकांशा सुरवाडे (वय 15), दीक्षा सुरवाडे (वय 13), अमित सुरवाडे (वय 8) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. असे एकूण 13 जण जखमी झाले असून पैकी ज्ञानेश्वर टेमकर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिघी परिसरात महादेव नगर येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये ज्ञानेश्वर टेमकर यांच्या राहत्या फ्लॅट नंबर 102मध्ये रात्रभर घरगुती सिलेंडरमधून गॅसगळती झाली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास विजेची उपकरण सुरू करण्यास गेल्यानंतर गॅसचा भीषण स्फोट झाला. यात शेजारील फ्लॅटलादेखील स्फोटाची तीव्रता जाणवली. यात एकूण 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने दोन्ही फ्लॅटच्या भींतींचे मोठे नुकसान झाले असून दरवाजे तुटले आहेत, तर खिडक्या ग्रीलसह निखळून पडल्या आहेत.

हेही वाचा - अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.