पुणे - लोकमान्यांच्या केसरीवाड्यामध्ये सोमवारी सकाळी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी केसरी वाड्याचा परिसर ढोल ताश्यांच्या गजरात दुमदुमून गेला होता.
लोकमान्य टिळकांनी 1893 ला सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर दरवर्षी केसरी वाड्यामध्ये टिळक कुटुंबियांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार यंदाही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. केसरी वाड्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली असल्यामुळे पुण्यातील गणेश भक्तांबरोबर परदेशी पर्यटक देखील यावेळी उपस्थित होते.