ETV Bharat / city

Booster Dose : 18 ते 59 वयाच्या नागरिकांना मोफत बूस्टर डोस सुरु, पुणेकरांचा अल्प प्रतिसाद - लसीकरण अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर

पुणे शहरातील अठरा वर्षावरील सर्व नागरिकांनी या केंद्रात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केले. पुणे शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना आजपासून विनामूल्य बूस्टर डोस देण्यास सुरुवात ( Free Booster Dose ) केली आहे.

Booster Dose
मोफत बूस्टर डोस सुरु
author img

By

Published : Jul 15, 2022, 3:48 PM IST

पुणे - शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना आजपासून विनामूल्य बूस्टर डोस देण्यास सुरुवात ( Free Booster Dose ) केली आहे. त्यासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ६८ केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड करोना प्रतिबंधक दोन्ही लशींची मात्रा दिली जाणार आहे.

मोफत बूस्टर डोस सुरु

आरोग्य विभागाचे आवाहन - शहरातील अठरा वर्षावरील सर्व नागरिकांनी या केंद्रात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केले. लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्या तसेच मागील तीन महिन्यात करोनाचा संसर्ग न झालेल्या व्यक्ती वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. घराच्या जवळील महापालिकेच्या दवाखाना अथवा रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ऑनलाइन बुकिंगसाठीची नोंदणी सुरू - नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून किंवा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन नोंदणी करूनही लस घेता येईल. निश्चित कोट्यानुसार या लशींच्या मात्रा उपलब्ध होतील. ऑनलाइन बुकिंगसाठीची नोंदणी सकाळी आठ वाजता सुरू होईल, अशी माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

हेही वाचा - Unique Marriage in Heavy Rain : नवरदेवाची पुरात कसरत... थर्माकोलच्या मदतीने 7 कि.मी. नदीमार्गाने जलप्रवास... अखेर पोहोचला नवरीकडे!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.