ETV Bharat / city

Five years kid reaches at Fort : कौतुकास्पद! पुण्यातील पाच-नऊ वर्षांच्या बहिण-भावडांनी लिंगाणा किल्ला केला सर - Five years Jyeshtha

भल्याभल्यांना घाम फोडणारा व अतिशय कठीण श्रेणीतील चढण असणारा लिंगाणा या किल्ल्यावर पुण्यातील 5 वर्षीय ज्येष्ठ माने आणि 9 वर्षीय बहिण अरुज्ञा माने या दोन चिमुरड्यांनी यशस्वी चढाई केली आहे. या चिमुरड्यांनी 25 ते 30 गडकिल्ल्यांवर यशस्वीपणे चढाई केली आहे. दोन्ही चिमुरड्यांचे कौतुक होत आहे.

बहिण-भावडांनी लिंगाणा किल्ला केला सर
बहिण-भावडांनी लिंगाणा किल्ला केला सर
author img

By

Published : Feb 17, 2022, 3:40 PM IST

Updated : Feb 17, 2022, 4:48 PM IST

पुणे - महाराष्ट्रातील तटबंदी व पायरी मार्ग नसणारा दुर्ग म्हणूनही लिंगाणा अतिशय ( Hard to climb Lingana ) अवघड मानला जातो. या खडतर किल्ल्यावर पुण्यातील पाच वर्षाच्या ज्येष्ठ माने ( Jyeshtha Mane ) आणि त्याची बहिण अरुज्ञा माने ( Arundya Mane ) या 9 वर्षाच्या चिमुरड्यांनी यशस्वी चढाई केली आहे. या दोन्ही चिमुरड्यांनी 25हून अधिक गडकिल्यांवर यशस्वी चढाई केली आहे.

महाराष्ट्रातील असंख्य गडप्रेमी व गिर्यारोहकांना आपल्या खडतर चढणीच्या प्रेमात पाडणारा व किल्ले रायगडाचा उपद्दुर्ग व कैदगृह म्हणजे लिंगाणा ( Lingana fort in Maharashtra ) आहे. भल्याभल्यांना घाम फोडणारा व अतिशय कठीण श्रेणीतील चढण असणारा किल्ला अशी ह्याची ख्याती आहे.

चिमुरड्यांची यशस्वी चढाई

हेही वाचा-Sanjay Raut : सोमैया यांची लोक धिंड काढतील; फडणवीस, अमित शाहांच्या नावे उकळले कोट्यवधी रुपये', संजय राऊतांचा आरोप
अशी झाली सुरवात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात कुटुंबातील व्यक्तींना वेळ दिला. याकाळात अनेकांनी टीव्ही व मोबाईलद्वारे एकत्र चित्रपट बघितले. त्या चित्रपटानंतर पालकांना मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. असाच काहीसा प्रकार पुण्यातील डॉ. अतुल माने यांच्या घरात घडला. लॉकडाऊनच्या काळात तान्हाजी चित्रपट ( Tanhaji Movie inspiration for fort climbing ) बघून दोन्ही मुलांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. तेथून गडकिल्ले चढाईला सुरुवात झाली पाहता या दोन्ही चिमुकल्यांनी आत्तापर्यंत 25हून अधिक गडकिल्ल्यांवर चढाई केली आहे.
हेही वाचा-ISIS threatens Yasin Bhatkal : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील वकिलाला इसिसची धमकी

असा सर केला लिंगाणा
13 फेब्रुवारीच्या भल्या पहाटे मोहोरी गावातून चालू झालेली मोहीम बोराट्याची नाळ ही अतिशय अवघड नाळ मानली जाते. त्यांनी उतरून लिंगाण्याच्या पायथ्याहून खडतर अश्या लिंगण्याच्या उंच माथ्यावर फडकणाऱ्या झेंद्याकडे येऊन पूर्ण केली. महत्वाची गोष्ट म्हणजे चढाई झाल्यावर त्या खडकांमधून पुन्हा उतरणे तो ही प्रवास ह्या दोन्ही बालकांनी हसत हसत केला. या सर्व उपक्रमात त्यांचा स्वतःचा मागील 25 ते 30 ट्रेकचा अनुभव, आई ऋतुजा माने व वडील डॉ. अतुल माने यांची साथ मिळाली. त्याचप्रमाणे सागर नलवडे यांच्या शिलेदार अडवेंचर इंडिया ग्रुप च टेक्निकल सपोर्ट लाभला. ही मोहीम ही शिवरायांच्या प्रेरणेने पुर्ण झाल्यामुळे त्यांनी शिवजयंतीची मानवंदना म्हणून समर्पित केली आहे.
हेही वाचा-Video : पुण्यात अल्पवयीन मुलाला बॅटने बेदम मारहाण; कबुतर चोरल्याचा आरोप

Last Updated : Feb 17, 2022, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.