ETV Bharat / city

पुण्यातील मेट्रोचे पहिले तिकीट अजित पवारांना; पहाटे संत तुकाराम नगर ते पिंपरी केली सवारी - Pune Metro news

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहाच्या सुमारास मेट्रो पाहाणीचा दौरा केला. यावेळी मोजकेच अधिकारी उपस्थित होते. फुगेवाडी येथे अजित पवार यांनी मेट्रो संदर्भातील बैठक घेतली यावेळी मुख्याधिकारी ब्रिजेश दीक्षित आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

First ticket of Pune PCMC metro issued to dep. CM ajit pawar
पुण्यातील मेट्रोचे पहिले 'तिकीट' अजित पवारांना; पहाटेच पिंपरी-चिंचवडमध्ये केली सवारी
author img

By

Published : Sep 18, 2020, 8:35 AM IST

Updated : Sep 18, 2020, 9:29 AM IST

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा धावता दौरा केला. मेट्रो संदर्भातील मुख्य अधिकारी ब्रिजेस दीक्षित यांच्या सोबत बैठक घेतली. दरम्यान, संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकातून सविस्तर पाहणी करत मेट्रोचे पहिले तिकीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. त्यानंतर अजित पवार, मेट्रो मुख्याधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्या समवेत काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा प्रवास केला.

पुण्यातील मेट्रोचे पहिले तिकीट अजित पवारांना; पहाटे संत तुकाराम नगर ते पिंपरी केली सवारी

दरम्यान, अजित पवार यांचा मेट्रो पाहाणीचा पहिलाच दौरा असल्याने मेट्रो चे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवार हे ठीक सहा वाजता फुगेवाडी येथील कार्यलयात पोहचले. तिथे उपस्थित मेट्रो अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केले, मेट्रो कार्यालयात मेट्रो संदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर, मुख्य मेट्रो रेल्वे स्थानकाकडे अजित पवार गेले, तिथे मेट्रोचा पाहणी दौरा करत मेट्रोच्या प्रवासाचा आनंद देखील घेतला.

काही मिनिटे झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे संत तुकाराम मेट्रो स्थानकात गेले. तिथे त्यांनी मेट्रो स्थानकाच्या पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या. यानंतर मेट्रोचे पहिले तिकीट अजित पवारांना देण्यात आले. त्यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी असा येऊन जाऊन प्रवास केला. मेट्रो चालकाच्या शेजारी थांबून पवारांनी मेट्रोची सवारी केली. हे सर्व होत असताना मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : मराठा आरक्षण : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

Last Updated : Sep 18, 2020, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.