ETV Bharat / city

ST Electric Bus Start : 'या' मार्गावर धावणार राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस; पाहा काय आहे वैशिष्ट्ये? - एसटी महामंडळ ई बस बातमी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( ST Electric Bus Start ) इलेक्ट्रिक बसेस लवकरच राज्यभर धावण्यास सुरुवात होणार आहे. राज्य परिवहन मंडळाची पहिली ( State Transport E Bus ) ई-बस 1 जून रोजी पुणे ते अहमदनगरला ( Pune To Ahmednagar First Electric Bus ) रवाना होणार आहे.

ST Electric Bus Start
ST Electric Bus Start
author img

By

Published : May 30, 2022, 3:38 PM IST

पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( ST Electric Bus Start ) इलेक्ट्रिक बसेस लवकरच राज्यभर धावण्यास सुरुवात होणार आहे. राज्य परिवहन मंडळाची पहिली ( State Transport E Bus ) ई-बस 1 जून रोजी पुणे ते अहमदनगरला ( Pune To Ahmednagar First Electric Bus ) रवाना होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या शिवाई बसचे उदघाटन होणार आहे.

प्रतिक्रिया

पुणे ते नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक - दरम्यान, बीएसआरटीसीची ( बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ) पहिली बस 1 जून 1948 पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती. त्यावेळी देखील अवैध वाहतूक होती. त्यांच्याकडून एसटीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्तात अहमदनगरमधील माळीवाडा बस स्थानक ते पुणे अशी बस नेण्यात आली होती. आता एसटी महामंडळाने क्रांतिकारी पाऊल उचलत 75व्या वर्धापन दिनी याच मार्गावर म्हणजेच पुणे ते नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

2 ईलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात - या बससाठी महामंडच्या विभागीय कार्यालय येथेच उभारण्यात येत असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. पीएमपीप्रमाणेच आता एसटीच्या ताफ्यातदेखील इलेक्ट्रिक गाड्या दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 2 इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, 1 जूनपासून एसटीच्या या गाड्यामधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

काय आहे वैशिष्ट्य - राज्यात जी पाहिली एसटी महामंडळाची ई-बस धावणार आहे. त्या ई-बसच्या आतमध्ये 2 कॅमेरे, बाहेर 1 कॅमेरा, त्याच्या निरीक्षणासाठी चालकाच्या आसनाशेजारी छोटा एलईडी, संपूर्ण वातानुकुलित बस, 10 हून अधिक बॅटरी ज्या एका चार्जमध्ये 200 ते 250 किमी धावणार, तसेच चालकाच्या शेजारी एक डिव्हाइस जो चालकावर नियंत्रण ठेवणार, अशी अत्याधुनिक सुविधा असलेली इलेक्ट्रिक बस पुण्याच्या विभागीय कार्यालयात धावण्यासाठी सज्ज झाली असून 1 जून पासून पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावणार आहे.

1 जूनला होणार उदघाटन - आता संपूर्ण जगामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवेश होत आहे. जी वाहन प्रदूषणमुक्त आहेत, अशा वाहनांना सर्वच ठिकाणी प्राधान्य देण्याचा निर्णय शासकीय स्थरावर घेण्यात आला आहे. त्यातीलच एक प्रयोग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 1 जूनला ग्रीनसेल या कंपनीची बस पुणे नगर या मार्गावर प्रथमतः सुरू करत आहोत. 1 जूनला सकाळी साडे नऊ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते ही बस मार्गस्थ होणार आहे. अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

असे असणार फेऱ्या - ही ई-बस पुण्यातील वाकडेवाडी आगारातून सकाळी 7 वाजता 11 वाजता दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 आशा 4 फेऱ्या पुणे ते नगर या मार्गावर इलेक्ट्रिक बसच्या होणार आहेत. या बससाठी एक चार्जिंग स्टेशन पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावरील विभागीय कार्यलयात करण्यात आले आहे. तर नगरमध्येदेखील चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. भविष्यात महामंडळाच्या ताफ्यात आणखी इलेक्ट्रिक बस दाखल होतील, असा विश्वासदेखील यावेळी रामांकात गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

'त्याच' वडाच्या झाडाखालून सुटणार बस- पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावरील विभागीय कार्यलयात एक वडाचे झाड आहे. याच वडाच्या झाडाखालून 1 जून 1948 साली पहिली बस पुणे ते नगर मार्गावर धावली होती. आता 1 जूनला याच वडाच्या झाडाखालून 75 वर्षानंतर राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस पुणे - नगर मार्गावर धावणार आहे.

हेही वाचा -राज्यसभा निवडणूक! भाजपने तिसरा उमेदवार दिला;घोडेबाजाराची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.