ETV Bharat / city

Gir Breed Calf Birth: भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्या गीर जातीच्या कालवडीचा जन्म

author img

By

Published : Aug 6, 2022, 3:56 PM IST

हा प्रकल्प पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागात ( Animal Husbandry and Dairy Science Department ) सुरू आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म ( first Gir breed calf birth in Pune ) संकरित गायीच्या माध्यमातून ‘गो संशोधन व विकास प्रकल्प’, राहुरी ( Cow Research and Development Project Rahuri ) येथे झाला आहे.

first Gir breed calf birth in Pune
गीर जातीच्या कालवडीचा जन्म

पुणे: हा प्रकल्प पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागात ( Animal Husbandry and Dairy Science Department ) सुरू आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म ( first Gir breed calf birth in Pune ) संकरित गायीच्या माध्यमातून ‘गो संशोधन व विकास प्रकल्प’, राहुरी ( Cow Research and Development Project Rahuri ) येथे झाला आहे. जन्मलेल्या कालवडीचे वजन २२.९ किलो असून, पिता विष्णू या वळूच्या वीर्याचा उपयोग करण्यात आला आहे. त्याच्या मातेचे दूध एका वेतात ४१६५ लीटर आहे व फॅट ५ % एवढे आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली. जास्त दूध देणाऱ्या आणि जातीवंत गायीपासून जन्मलेल्या आणि आपले गुण पुढच्या पिढीला देण्यात सक्षम असणाऱ्या नर वळूचीच निवड केली जाते.

उच्च वंशावळीचा देशी गोवंश निर्मितीकडे वाटचाल - महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या ( Desi Cow Research Training Centre in Maharashtra ) माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी दिली. हे तंत्रज्ञान एनडीडीबी राहुरी यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीचा देशी गोवंश व त्यांची संख्या वाढवण्यासाठी, संवर्धनासाठी खूप मोठी मदत होणार आहे.या तंत्रज्ञानाबद्दल संचालक संशोधन डॉ. शरद गडाख म्हणाले, सध्या देशातील शुद्ध देशी गोवंशाची असलेली घटती संख्या पाहता जलदगतीने उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या गाईंची संख्या वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञाना शिवाय तरणोपाय नाही.

या संशोधकांचा सिंहाचा वाटा - संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, डॉ. कांबळे यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. धीरज कणखरे, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ अडांगळे तसेच एनडीडीबी राहुरी सिमेन स्टेशनचे डॉ. शिवकुमार पाटील हे काम करत आहेत.

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय? - उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगली अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे होय. यापासून तयार झालेल्या फलित अंड्याची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित केले जाते. त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळवणे शास्त्रज्ञांना अपेक्षित असते. देशामध्ये देशी गाईंची घटती संख्या पाहता भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांच्या दारापर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गाईच्या संख्येपैकी ७५ टक्के गाई गावठी स्वरूपात आढळत. फक्त २५ गाई शुद्ध स्वरूपात आहेत. त्यामुळे भविष्यात उच्च दर्जाच्या जलदगीतेने गाई तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज असेल, असे मत कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - woman raped by three men : ३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांचा बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.