ETV Bharat / city

Pune Bullock Cart Race : पुण्यातील आंबेगाव घाटात पुन्हा घुमला 'भिररर्र' चा आवाज; 350 बैलगाड्यांची शर्यत - bullock cart race

पुण्याच्या आंबेगाव घाटात पुन्हा एकदा भिररर्रचा आवाज घुमला ( Pune Bullock Cart Race ) आहे. गेल्या आठ वर्षांपासून याची प्रतीक्षा बैलगाडा चालक, मालक आणि प्रेमींना होती त्या बैलगाडा शर्यतीला आज ( Permission for bullock cart race in Pune ) मुहुर्त लागला. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून येथे बैलगाडा शर्यतीचे ( Former MP Shivaji Adhalrao on Bullocks Race ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैलगाडा प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे आंनद गगणात मावत नाही आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन ( Supreme Court Permission to bullock cart race ) करून बैलगाडा शर्यती करू अशी भावना बैलगाडा प्रेमींनी व्यक्त केली आहे.

Pune Bullock Cart Race
पुण्यातील आंबेगाव घाटात पुन्हा घुमला 'भिररर्र' चा आवाज
author img

By

Published : Feb 11, 2022, 2:05 PM IST

पुणे - पुण्याच्या आंबेगाव घाटात पुन्हा एकदा भिररर्रचा आवाज घुमला ( Pune Bullock Cart Race ) आहे. गेल्या आठ वर्षांपासून याची प्रतीक्षा बैलगाडा चालक, मालक आणि प्रेमींना होती त्या बैलगाडा शर्यतीला आज ( Permission for bullock cart race in Pune ) मुहुर्त लागला. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून येथे बैलगाडा शर्यतीचे ( Former MP Shivaji Adhalrao on Bullocks Race ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैलगाडा प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे आंनद गगणात मावत नाही आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन ( Supreme Court Permission to bullock cart race ) करून बैलगाडा शर्यती करू अशी भावना बैलगाडा प्रेमींनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील आंबेगाव घाटात पुन्हा घुमला 'भिररर्र' चा आवाज

पुणे जिल्ह्यातील पहिल्या शर्यतीच आयोजन -

आम्ही बैलांना मुलाप्रमाणे जपतो त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणू नये अशी कळकळीची मागणी देखील बैलगाडा प्रेमींनी केली आहे. आंबेगाव येथे लांडे वाडी घाटात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहिला मिळाला आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी या पुणे जिल्ह्यातील पहिल्या शर्यतीच आयोजन केले आहे.

साडे तीनशे बैलजोड्या धावणार -

सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्थींसह बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर पुण्यात आज पहिल्यांदाच घाटात धुरळा उडाला. आंबेगाव आणि मावळ तालुक्यात दोन दिवस शर्यत पार पडणार आहे. लांडेवाडीच्या घाटात सातशे तर नाणोलीच्या घाटात साडे तीनशे बैलजोड्या धावणार आहेत. आठ वर्षाची प्रतीक्षा संपल्याने बैलगाडा शौकिनांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळाल आहे. आपल्या मुलासमान निगा राखलेल्या सर्जा-राजाची जोडी घाटात धावली अन बैलगाडा मालक, चालक अन शौकिनांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पुण्यातील शिरूर लोकसभेसाठी हा सर्वात महत्वाचा विषय मानला जातो. म्हणूनच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यासाठी लढा देत होते. सशर्त परवानगी मिळताच त्यांनी शर्यतीचे आयोजन केले होते.

कोरोनाचे सर्व नियम पाळून शर्यत -

यावेळी शिवसनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, पुणे आणि नगर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळताच, पहिली आणि अधिकृत प्रशासनाच्या परवानगीने लांडेवाडी येथे पार पडत आहे. मी सांगितलं होतं की महाराष्ट्रातील पहिली बैलगाडा शर्यत याच घाटात होईल. त्या प्रमाणे या घाटात सकाळी सात वाजता बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे. आज आणि उद्या बैलगाडा शर्यत होणार आहे. पहाटे चार वाजल्यापासून बैलगाडा प्रेमी आणि चालक, मालकांची मोठी गर्दी आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही शर्यत पार पडत आहे. अस आढळराव पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा - Bullocks Race Incident Satara : सातार्‍यात शर्यतीवेळी बैलगाडा विहिरीत कोसळला, दोन बैलांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.